• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: मुख्यमंत्री सभास्थळी दाखल, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु

Live Updates: मुख्यमंत्री सभास्थळी दाखल, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु

राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 08, 2022, 20:06 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:25 (IST)

  विधान परिषदेसाठी भाजप 6वा उमेदवार उतरवणार
  उद्या 2 भाजप उमेदवारांचे अर्ज भरले जाणार - सूत्र
  सहावा उमेदवार हा पश्चिम महाराष्ट्रातून असेल - सूत्र

  22:4 (IST)

  सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला

  21:52 (IST)

  'काहीतरी ठोस मिळेल, उगाच त्यांची अपेक्षा होती'
  पण संभाजीनगरवासीयांना मिळालं काय? - फडणवीस
  पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे - फडणवीस
  फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेची खिल्ली

  21:9 (IST)

  औरंगाबादेत उद्धव ठाकरेंची पार पडली सभा
  हिंदुत्व हा आपला श्वास आहे - उद्धव ठाकरे
  'पाणीप्रश्न असताना मी पाठ फिरवणार नाही'
  संभाजीनगरला पाणी मिळालं पाहिजे - सीएम
  'औरंगाबादेतील पाणीप्रश्न लवकर सोडवणार'
  समांतर पाणी योजना पूर्ण करण्याचे आदेश
  आक्रोश मोर्चावरून विरोधकांवर निशाणा
  'पाण्यासाठी नव्हे, सत्ता गेल्यानं आक्रोश मोर्चा'
  खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही - सीएम
  औरंगाबादेत मेट्रो आणणार - उद्धव ठाकरे
  'संभाजीनगर करण्याचं वचन पूर्ण करणार'
  'बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं'
  'आमचं हिंदुत्व विचारणारे तुम्ही कोण आहात?'
  भाजपनं हिंदुत्वासाठी काय केलं? - सीएम
  एकदा होऊन जाऊ द्या, भाजपला खुलं आव्हान
  'मर्द असाल तर काश्मिरी पंडितांची सुरक्षा करा'
  अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे - उद्धव ठाकरे
  संयम सुटला तर त्याच भाषेत उत्तर देऊ - सीएम
  आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही - सीएम
  हा देश हाच माझा धर्म - उद्धव ठाकरे
  भाजपची भूमिका ही देशाची भूमिका नाही - सीएम
  'भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की'
  डोक्यात हिंदुत्व असलं पाहिजे - उद्धव ठाकरे
  इतिहास कुणीही मिटवू शकत नाही - सीएम
  मोहन भागवतांची भूमिका स्वागतार्ह - सीएम
  विरोधी पक्ष मूळ मुद्यांना बगल देतोय - सीएम
  कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय - उद्धव ठाकरे
  ऊर्जा-उद्योगात कोट्यवधींचे करार - सीएम
  'भाजप सुपारी देऊन भोंगा, चालिसा वाचून घेतं'
  उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
  समृद्धी महामार्ग लवकरच सेवेत - उद्धव ठाकरे
  मंदिरं, गड-किल्ल्यांचं संवर्धन - उद्धव ठाकरे
  महाराष्ट्राची विकासाच्या दृष्टीनं वाटचाल - सीएम
  'मुख्यमंत्रिपद सांभाळणं ही तारेवरची कसरत'
  मित्र हाडवैरी झाले, वैरी चांगले मित्र झाले - सीएम
  केंद्रात सरकार आल्यानंतर वैरी बनले - सीएम
  सरकार पडत नसल्यानं विरोधक अस्वस्थ - सीएम
  आम्ही शेतकऱ्याला बांधील - उद्धव ठाकरे
  अच्छे दिन कधी येणार? उद्धव ठाकरेंचा सवाल
  महागाई, इंधन दरवाढीवरून केंद्रावर टीका
  'आधी भाव वाढवायचे, मग कमी करायचे'
  पीक विमा योजना नक्की कुणासाठी? - सीएम
  महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम - उद्धव ठाकरे
  मी दिलेल्या वचनाला जागलोय - उद्धव ठाकरे
  'ईडी-CBIच्या धाडी काश्मीरमध्ये टाकून दाखवा'
  इथं बांगलादेशी येऊ शकतात - सीएम
  '...तर काश्मिरी पंडित काश्मीरमध्ये का नाही?'
  कुठे नेऊ ठेवणार हिंदुस्थान माझा? भाजपला सवाल
  हृदयात राम, हाताला काम हेच आमचं हिंदुत्व - सीएम
  हे भाड्यानं आणलेले लोक नाहीत - उद्धव ठाकरे
  आमचं हिंदुत्व 'गदा'धारी, गधाधारी नव्हे - सीएम

  20:7 (IST)

  मुख्यमंत्री सभास्थळी दाखल, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु

  18:52 (IST)

  - मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद येथील सभेला सुरुवात, अर्जुन खोतकरांचं पहिलं भाषण
  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं विमानतळावर आगमन

  18:41 (IST)

  मविआ शिष्टमंडळ आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट
  राज्यसभेसाठी मविआकडून बविआची मनधरणी
  हितेंद्र ठाकूरांची फोनवरून शरद पवारांशी चर्चा

  18:29 (IST)

  बारावी पास विद्यार्थ्यांची उद्यापासून पदवीच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार, मुंबई विद्यापीठाचं प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर, 9 जून ते 20 जूनदरम्यान ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रवेशपूर्व अर्ज भरता येणार, mumbai.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज ऑनलाईन भरता येईल

  18:18 (IST)

  भाजप जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी रोखलं
  पाणीप्रश्नी निवेदन देण्यासाठी गेले होते
  संजय केनेकर मुख्यमंत्र्यांना देणार होते निवेदन

  17:46 (IST)

  देशमुख, मलिकांना मतदान मुभा मिळणार का?
  मतदानाच्या परवानगी अर्जावर उद्या फैसला
  न्या.रोकडे पहिल्या सत्रात जाहीर करणार निकाल
  दोघांच्या अर्जाला ईडीचा जोरदार विरोध
  विशेष कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स