Live Updates: यवतमाळमध्ये आंदोलक एसटी कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 08, 2021, 23:37 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  23:36 (IST)

  यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी वाहक कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा झटका, निलंबित केल्याची नोटीस प्राप्त होताच आला हृदय विकाराचा झटका, सुदर्शन टेकाळे असे वाहकाचे नाव, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आगारात कार्यरत, नांदेडच्या रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

  22:31 (IST)

  नागपूरचा गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम्प्रेस मॉल जवळ प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना, घटनास्थळी पोलीस पोहचले, पुढील तपास सुरू 

  22:4 (IST)

  संजय राऊत आणि प्रियांका गांधींची दिल्लीत भेट
  सोनिया गांधींच्या निवासस्थानी तासभर चर्चा
  यूपीएबाबत खलबतं, काही गोष्टींवर दोन्ही पक्षांचं एकमत

  21:25 (IST)

  राज्यातील ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज
  कल्याणच्या कोविड सेंटरमध्ये होता विलगीकरणात
  आफ्रिकेच्या केपटाऊनमधून आला होता डोंबिवलीत

  21:23 (IST)

  आशिष शेलारांचं कथित वक्तव्य प्रकरण
  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक
  मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  शेलारांना जामिनासाठी कोर्टात जावं लागणार

  21:3 (IST)

  डोंबिवलीl : राज्यातल्या ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज

  ओमायक्रॉन रुग्णाला मिळाला डिस्चार्ज

  कल्याणच्या कोव्हिड सेंटरमध्ये होता विलगीकरणात 

  दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून 24 नोव्हेंबरला आला होता डोंबिवलीत

  21:3 (IST)

  सांगली : दक्षिण आफ्रिकेवरून सांगली जिल्ह्यातील जतमध्ये आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह. 

  त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले

  रुग्ण 7 दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून सांगली जिल्ह्यात आला होता

  5 दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी मिरज सिव्हीलला उपचारासाठी दाखल करण्यात आले 

  मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतलेला आता त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे

  21:2 (IST)

  20:59 (IST)

  बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध

  बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता 19 डिसेंबर रोजी मतदान होणार होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार प्रगती पॅनलचे 15 उमेदवारांच्या विरोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्याने बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे

  20:33 (IST)

  विधान भवन परिसरात बसमध्ये बेवारस बॅग
  बेस्टची बसची बॉम्बशोध पथकानं केली तपासणी
  बेवारस बॅगेत संशयास्पद काही नव्हतं
  प्रवाशाची विसरलेली बॅग असल्याचा प्राथमिक अंदाज
  'ती' बॅग मरीन लाईन्स पोलिसांनी केली जमा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स