LIVE : सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात कडक निर्बंध लागू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 08, 2021, 23:20 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:13 (IST)

  राज्यात डेल्टा प्लसचे 45 रुग्ण - राजेश टोपे
  'डेल्टाचे रुग्ण वाढले तरी घाबरण्याचं कारण नाही'
  जिथं रुग्ण वाढतात तिथं खबरदारी घेणं गरजेचं - टोपे

  22:9 (IST)

  मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक सुरू
  आरक्षणाची 50% अट शिथिल करण्याची मागणी
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
  4 प्रमुख पक्षांच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची बैठक
  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत चर्चा
  खरगे, अशोक चव्हाण, अरविंद सावंत उपस्थित
  प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित
  अभिषेक मनू सिंघवी, मुख्य सचिव कुंटे उपस्थित
  महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित

  20:36 (IST)

  मुख्यमंत्र्यांचा राज्यातील जनतेशी संवाद
  नीरज चोप्रानं देशाची मान उंचावली - मुख्यमंत्री
  'कोरोनाचं संकट अजूनही संपलेलं नाही'
  किती लाटा येतील याचा अंदाज नाही - मुख्यमंत्री
  'कोविडची दहशत उलथवून लावावी लागेल'
  'वेधशाळेनं अतिवृष्टीचा अंदाज दिला होता'
  'अतिवृष्टी किती होईल याचा अंदाज नव्हता'
  अतिवृष्टीत प्रशासनाचं उत्तम काम - मुख्यमंत्री
  'लाखो नागरिकांचं योग्यवेळी केलं स्थलांतर'
  'मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वाचवू शकलो'
  'ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळू लागलेत'
  कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज - मुख्यमंत्री
  राज्याला नैसर्गिंक आपत्तींचा तडाखा - मुख्यमंत्री
  कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री
  'तात्काळ मदत, भविष्यातल्या उपाययोजना सुरू'
  'धोकादायक वस्त्याचं पुनर्वसन आवश्यक'
  दूरगामी उपाययोजनांची गरज - मुख्यमंत्री
  आपतीग्रस्तांना वाढीव मदतीची गरज - मुख्यमंत्री
  काळानुरूप निकष बदलण्याची गरज - मुख्यमंत्री
  'नरेंद्र मोदींना आम्ही सहकार्याची विनंती केली'
  'मराठा, ओबीसी आरक्षणप्रश्नी मदतीची विनंती'
  'आरक्षणाची 50 टक्के अट शिथिल करून द्या'
  'गेल्या वर्षी सणानंतर दुसरी लाट आली होती'
  आता लसीकरणाचा वेग वाढलाय - मुख्यमंत्री
  कोरोना नियमांचं पालन सक्तीचंच - मुख्यमंत्री
  तिसरी लाट आली तर आम्ही तयार - मुख्यमंत्री
  'गेल्या वर्षी आजच्यापेक्षा चांगली स्थिती होती'
  राज्यात आता डेल्टा व्हेरियंट आलाय - मुख्यमंत्री
  काही ठिकाणी कोरोना नियंत्रणात - मुख्यमंत्री
  काही ठिकाणी काळजी अत्यावश्यक - मुख्यमंत्री
  'जिथं पूर आला तिथं अधिक काळजीची गरज'
  उद्यापासून काही ठिकाणी शिथिलता - मुख्यमंत्री
  'पुणे, नगर, सोलापूर, सिंधुदुर्गात काळजीची गरज'
  प्रशासकीय यंत्रणांवरचा ताण वाढतोय - मुख्यमंत्री
  'कोरोनामुक्तीसाठी अनेक सरपंचांचा प्रतिसाद'
  'लसीचे 2 डोस झालेल्यांना शिथिलता मिळणार'
  गर्दी झाल्यास रुग्णवाढ होण्याचा धोका - मुख्यमंत्री
  'शिथिलतेसाठी 8 दिवसांचा कालावधी लागेल'
  राज्यातली जनता सुज्ञ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  'बंधनं शिथिल करायला सुरुवात करतोय'
  कोरोनावरून राजकारण करू नका - मुख्यमंत्री
  लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी
  '15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा'
  'लसीचे 2 डोस घेतलेल्यांना लोकलची मुभा'
  2 डोस घेतलेल्या मुंबईकरांसाठी खुशखबर
  मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
  'हॉटेल, रेस्टॉरंट, मॉलसंदर्भात उद्या निर्णय'
  टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय - मुख्यमंत्री

  18:41 (IST)

  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल
  फडणवीस, दरेकरांसोबत निरंजन डावखरेही
  अमित शाहांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता
  भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनाही दिल्लीत भेटणार

  18:39 (IST)

  पूरग्रस्त महाड आणि चिपळूणला वाढीव मदत द्यावी, विमा कंपन्यांकडून शेतकरी व व्यावसायिकांची होणारी अडवणूक थांबवावी, पूरग्रस्तांच्या मदतीचा शासन आदेश तातडीनं निर्गमित करावा - नाना पटोले

  18:4 (IST)

  अफगाणच्या सैन्याचा दहशतवाद्यांवर एअरस्ट्राईक
  हल्ल्यात 45 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा

  17:48 (IST)

  निर्बंध शिथिल करणं तर सोडाच - आशिष शेलार
  शासनाला संवादही साधायचा नाही - आशिष शेलार
  मंडळानं सण कसे साजरे करायचे? - आशिष शेलार
  'मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा काय संबंध?'
  हिंदू सणावर इतका राग का आहे? - आशिष शेलार
  'सर्वांच्या हाताला पैसे मिळतील असे निर्णय घ्या'

  16:59 (IST)

  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांची दिल्लीवारी
  अमित शाहांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार?
  भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही घेणार भेट
  केंद्रीय मंत्री, खासदारांच्या बैठकीला हजर राहणार

  16:58 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंना सल्ला
  'आता कुणी पुण्याचं काही विचारल्यास सांगा पालकमंत्री निर्णय घेतील'
  मुख्यमंत्र्यांशी बोलून मीच निर्णय घेणार - अजित पवार
  प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही - अजित पवार

  16:50 (IST)

  पुण्यात उद्यापासून अनलॉक, सर्वात मोठी बातमी
  पुण्यातील कोरोना निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता
  पुण्यातील दुकानं स.7 ते रात्री 8 पर्यंत खुली
  मॉल रात्री 8 पर्यंत, 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश
  पुण्यातील हॉटेल रात्री 10 पर्यंत चालू राहणार
  शनिवार, रविवारी सर्व सेवांना दु.4 पर्यंत मुभा
  मॉल, हॉटेल, जलतरण तलावासाठी नवे नियम
  'जिम, स्विमिंग पूल, उद्यानं सुरू राहणार'
  रुग्णसंख्या वाढल्यास कडक नियम - अजित पवार
  'दुकानदार, नागरिकांना मास्कची सक्ती'
  'कोरोना न वाढण्याची सर्वांनी खबरदारी घ्यावी'
  पॉझिटिव्ह रेट वाढल्यास पुन्हा निर्बंध - अजित पवार
  'ग्रामीण भागात लेव्हल 3 चे निर्बंध लागू असतील'
  पुण्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही - अजित पवार
  कोरोनामुक्त जिल्ह्यांमध्ये सवलत - अजित पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स