LIVE : संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या महिलेला बोगस डिग्री प्रकरणात अटक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 08, 2021, 22:47 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:19 (IST)

  नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 50च्या आत
  नवी मुंबईत दिवसभरात चौघांचा कोरोनानं मृत्यू

  22:13 (IST)

  केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसींचे दर निश्चित, कोव्हिशिल्ड 780, कोव्हॅक्सिन 1410, स्पुटनिक-व्ही 1145 रुपये

  22:6 (IST)

  मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलावरील वाहतूक उद्या रात्रीपासून राहणार बंद, नवीन पुलावर स्लॅब टाकण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक रात्रभर राहणार बंद

  22:6 (IST)

  अहमदनगर - 'न्यूज18 लोकमत'च्या दणक्यानंतर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे सक्तीच्या रजेवर, कोरोना काळात बर्थ-डे पार्टी पडली महागात

  21:44 (IST)

  कोरोनामुळे अनुपस्थित राहणाऱ्यांना पुन्हा परीक्षेची संधी, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा पुढाकार

  20:32 (IST)

  मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा
  रत्नागिरीत प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

  20:3 (IST)

  भाजपच्या कोअर कमिटीची झाली बैठक
  भाजपच्या संघटनात्मक विकासाच्या गतीवर चर्चा
  मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर चर्चा
  स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणाबाबत चर्चा
  या सर्व मुद्यांवर घ्यायच्या भूमिकेवर चर्चा
  आगामी अधिवेशनाबाबतही बैठकीत चर्चा

  19:20 (IST)

  राज्यात दिवसभरात 16,577 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 10,891 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 295 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.35, मृत्युदर 1.73%
  राज्यात सध्या 1 लाख 67,927 अॅक्टिव्ह रुग्ण

  18:13 (IST)

  भारतातील लहान मुलांना लवकरच मिळू शकते लस
  झायकोव्ह-डी लसीचं तिसऱ्या फेजचं ट्रायल
  मुंबईतील नायर रुग्णालयात होणार ट्रायल
  झायडस-कॅडीला कंपनीची 'झायकोव्ह-डी' लस
  नायर रुग्णालयात 50 मुलांची होणार ट्रायल
  12 वर्षांपुढील मुलांना लस दिली जाणार
  मुंबईतील नायर रुग्णालयाची तयारी
  एथिक्स कमिटीच्या मंजुरीची फक्त प्रतीक्षा

  18:11 (IST)

  एमआयडीसी वेबसाईट हॅकिंग प्रकरण
  राज्य सरकारकडून रशियन सरकारला विनंती
  रशियन हॅकर्सवर कारवाई करण्याची मागणी
  अशा प्रकरणात मदत कधीच मिळत नाही -सूत्र
  ही फक्त एक प्रक्रिया आहे - सूत्रांची माहिती
  मात्र मुख्य वेबसाईट अजूनही हॅकर्सच्या ताब्यात
  नवी वेबसाईट तयार करून MIDCचं काम सुरू
  हॅकर्सनं 500 कोटी रुपये मागितली होती खंडणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स