LIVE : भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | February 08, 2021, 16:20 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:21 (IST)

  पनवेलमधील खारघरमध्ये सामूहिक बलात्कार
  ओळखीच्या दोन तरुणांकडून अत्याचार
  तरुणीला कोल्ड्रिंकमधून पाजली दारू
  एकाला खारघर पोलिसांनी केली अटक
  फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू

  21:14 (IST)

  नंदुरबार - नवापूरमधलं बर्ड फ्लूचं संकट वाढलं, आणखी 4 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह, आतापर्यंत 8 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह

  19:54 (IST)

  सेलिब्रिटी ट्विट चौकशीवरून कॉंग्रेसवर टीका
  टीकेनंतर सचिन सावंत यांची सावध भूमिका
  'आम्ही केलेल्या मागणीचा भाजपकडून विपर्यास'
  विपर्यास करून बोंब ठोकत आहे -सचिन सावंत
  'भाजपच्या चौकशीची मागणी, सेलिब्रिटींची नाही'
  'सेलिब्रिटींना भाजपपासून संरक्षण देण्याची मागणी'
  कॉंग्रेसच्या सचिन सावंत यांनी केलं ट्विट
  'लतादीदी, सचिन तेंडुलकर समाजातील आदर्श'
  'त्यांनी व्यक्त केलेलं मत हे महत्वाचं, त्यांचं असेल'
  पण इतरांचं काय? सचिन सावंतांचा सवाल

  19:44 (IST)

  अभिनेत्री कंगना राणावतविरोधात बेळगाव पोलिसात तक्रार, सातत्यानं वादग्रस्त विधानं करून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप; ॲड.हर्षवर्धन पाटील यांनी दाखल केली तक्रार

  19:12 (IST)

  कोरोना आढाव्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणा अधिक सतर्क करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

  19:10 (IST)

  'भारतरत्नानं सन्मानित केलेल्या व्यक्ती'
  आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय -गृहमंत्री
  'पण त्यांच्यावर कोणी दबाव टाकला का?'
  'त्या नेत्याच्या चौकशीची कॉंग्रेसकडून मागणी'
  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्विट

  18:56 (IST)

  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून होणार 100 मेगावॅट विद्युत निर्मिती, महापालिकेच्या स्थायी समितीची प्रकल्पाला मंजुरी, संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी बृहन्मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका, 20 मेगावॅट जलविद्युत तर 80 मेगावॅट तरंगती सौरऊर्जा अशी एकूण 100 मेगावॅट क्षमता, दरवर्षी सुमारे 208 दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती होणार, महापालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी 24 कोटी 18 लाखांची बचत होणार

  17:36 (IST)

  दबाव टाकून जर ट्विट करणार असतील तर त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, दबाव टाकणाऱ्यांवरही कारवाई करायला हवी -उदय सामंत

  17:23 (IST)

  'माझी जत्रा माझी जबाबदारी' या नावानं यावर्षीची भराडीदेवीची सार्वजनिक जत्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कोरोना 
  नियम पाळून धार्मिक विधी होणार, पुढच्या वर्षी आंगणेवाडी जत्रा मोठ्या उत्साहात साजरी करणार, आंगणे कुटुंबीयांच्या 
  निर्णयाला सहकार्य करावं, येणाऱ्या यात्रेकरूंना केली नम्र विनंती

  17:3 (IST)

  नागपूर - भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक
  अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
  विभागीय जिल्हा नियोजन समितीची बैठक
  बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार
  भाजप आमदारांनी केली निदर्शनं
  डीपीसीचा निधी वाढवून देण्याची मागणी
  'नागपूर महापालिकेला निधी देण्यात यावा'

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स