अंमली पदार्थांविरोधी कारवाईसाठी मोठं पाऊल
'प्रत्येक जिल्ह्यात होणार अंमली पदार्थ विरोधी कक्ष'
'पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली होणार कक्ष स्थापन'
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले निर्देश
20:40 (IST)
मुंबई - माहीम मंदिरातील मूर्ती गायब प्रकरणी मनसेकडून पत्र
सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटलांना पत्र
विश्वस्तांवर लवकर गुन्हा नोंदवण्यात यावा - मनसे
गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबेंनाही पत्र
उद्या सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटलांनी माहीम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना बोलावलं भेटायला
20:6 (IST)
पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
नरिमन पॉईंट इथल्या कार्यालयावर टाकला होता छापा
आज सकाळी 6 वाजता आयकर विभागाची धाड
7 ते 8 जणांची टीम, 12 तास केली चौकशी
आयकर विभागानं काही कागदपत्रं घेतल्याची माहिती
20:1 (IST)
नागपूर - 10 दिवसांच्या वाघाच्या बछड्याचा शिकार करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक, बुटीबोरी परिक्षेत्र अंतर्गत वन विभागाची कारवाई, आणखी काही तस्कर सहभागी होते का याची वन विभागाकडून चौकशी
19:46 (IST)
'पर्यावरण जपून शाश्वत विकास होणं गरजेचं'
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं वक्तव्य
19:44 (IST)
'महाराष्ट्रात आज आयकर विभागाची छापेमारी'
1050 कोटींपेक्षा जास्त व्यवहार उघड - प्राप्तिकर खातं
19:10 (IST)
आर्यनच्या वकिलांकडून कोर्टात जामिनासाठी अर्ज
जामीन अर्जावर उद्या 11 वाजता सुनावणी
अर्जावर उद्या सकाळी एनसीबीनं उत्तर द्यावं - कोर्ट
आम्ही जामिनाला विरोध करणार - सरकारी वकील
19:2 (IST)
ड्रग्ज पार्टी प्रकरणी सर्वात मोठी बातमी
आर्यन खानला न्यायालयीन कोठडी
आर्यनसह 8 जणांना न्यायालयीन कोठडी
सर्व आरोपींना 14 दिवसांची न्या. कोठडी
17:53 (IST)
चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा, राज्यात हवाई वाहतूक सेवा वाढवण्यासाठी विमानतळांच्या विकासात राज्य शासन-नागरी हवाई वाहतूक मंत्रालय समन्वय ठेवणार - उद्धव ठाकरे
17:32 (IST)
अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन
गोव्याच्या पणजी कंट्रोल रूमला अज्ञाताचा फोन
प्रशासनाकडून मंदिर दर्शनासाठी तात्काळ बंद
बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स