Live Updates: देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार लीलावती रुग्णालयात, राणा दाम्पत्याची घेतली भेट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | May 07, 2022, 22:33 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    22:27 (IST)
    कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावाजवळ असलेल्या एका दगडखाणीत पाण्यात पडून कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, त्यामध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश
     
    22:2 (IST)

    सटाणा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे, राष्ट्रवादीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळांचं कार्यकर्त्यांना आवाहन

    22:2 (IST)

    सटाणा - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा, नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे, राष्ट्रवादीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळांचं कार्यकर्त्यांना आवाहन

    21:57 (IST)

    देवेंद्र फडणवीसांनी घेतली नवनीत राणांची भेट
    लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन केली विचारपूस
    देवेंद्र फडणवीसांसोबत आशिष शेलारही होते

    21:16 (IST)

    'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमाचा ट्रेलर लॉंच
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ट्रेलरचं लॉंचिंग
    अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख उपस्थित
    ट्रेलर लॉंच सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती
    13 तारखेला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
    'धर्मवीर'चा ट्रेलर मला फार आवडला - सलमान खान
    गुरू-शिष्य नातं जपणारा एकमेव पक्ष - उद्धव ठाकरे
    आनंद दिघेंनी अनेकांना जपलं - उद्धव ठाकरे
    'अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला'
    पण त्यांनाच शिवसेनेनं संपवलंय - उद्धव ठाकरे
    सिनेमात निष्ठा काय असते हे कळेल - उद्धव ठाकरे
    हे श्रद्धास्थान अबाधित राहील - उद्धव ठाकरे
    एकनाथ शिंदे आणि टीमचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    20:47 (IST)

    'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमाच्या ट्रेलरचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉंचिंग, या सोहळ्याला अभिनेता सलमान खानही होता उपस्थित, 13 मे रोजी सर्व चित्रपटगृहात 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमा प्रदर्शित होणार

    20:38 (IST)

    'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमाचा ट्रेलर लॉंच
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित
    सोहळ्याला अभिनेता सलमान खानही उपस्थित
    13 तारखेला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

    20:26 (IST)

    जितो कनेक्ट 2022 कार्यक्रमात पुणेरी पगडी देऊन शरद पवारांचा सत्कार

    19:59 (IST)

    पुण्यात मनसेच्या वसंत मोरेंकडून भव्य महाआरती, मुस्लिम बांधवांचाही महाआरतीत सहभाग

    19:55 (IST)

    संपूर्ण महाराष्ट्र, देश जाणून आहे -यशवंत किल्लेदार
    'कोण असली, कोण नकली' पोस्टरवरून सेनेला टोला
    सत्तेसाठी हिंदुत्व लाथाडलंय - यशवंत किल्लेदार
    राज ठाकरेंचं हिंदुत्व सोन्यासारखं अस्सल - किल्लेदार
    आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका - किल्लेदार

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स