Live Updates: राष्ट्रवादीचे 9 आणि 10 जूनला दिल्लीत होणार राष्ट्रीय अधिवेशन!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | December 07, 2021, 19:55 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:44 (IST)

  मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूस्खलन होणाऱ्या धोकादायक ठिकाणी उपाययोजनांसाठी 61 कोटींच्या खर्चाला पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली मंजुरी

  21:43 (IST)

  पंढरपुरातून देवदर्शन करून घराकडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं चारचाकी वाहन पलटलं, या अपघातात 38 भाविक जखमी, चिखली देऊळगावराजा मार्गावरील मेरा चौकीफाट्याजवळची घटना

  21:32 (IST)

  साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरण
  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
  ईडीनं प्राजक्त तनपुरेंना बजावलं होतं समन्स
  महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीचं ग्रहण

  20:54 (IST)

  साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरण
  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
  ईडीनं प्राजक्त तनपुरेंना बजावलं होतं समन्स
  प्राजक्त तनपुरेंची 9 तासांपासून चौकशी सुरूच
  महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडीचं ग्रहण

  20:33 (IST)

  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
  शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत मंथन
  पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर बैठकीत चर्चा
  महत्त्वाच्या विविध राष्ट्रीय घडामोडींबाबत चर्चा

  19:38 (IST)

  राज्यात आज 5051 कोटींचे गुंतवणूक करार, 9 हजार जणांना नोकरीची नवी संधी - सुभाष देसाई

  19:31 (IST)

  'सोया पेंड आयात करण्याचा कोणताही विचार नाही'
  केंद्र सरकारची स्पष्टोक्ती, पियूष गोयल यांचं ट्विट
  पाशा पटेलांच्या भेटीनंतर गोयलांकडून निर्णय जाहीर

  18:57 (IST)

  भाजपचे नगरसेवक आणि राजश्री शिरवडकर आक्रमक
  वॉर्ड संरचना, वॉर्डसंख्या वाढीविरोधात हायकोर्टात याचिका
  राज्य सरकार, निवडणूक आयुक्तांविरोधात याचिका दाखल

  18:42 (IST)

  'यूपीएसंदर्भात शिवसेनेचा निर्णय गुलदस्त्यात'
  आगामी 24 तासांनंतर निर्णय घेणार - संजय राऊत

  18:8 (IST)

  त्रंबकेश्वरच्या पुरोहितांमध्ये तुंबळ हाणामारी
  पूजेल्या आलेल्या यजमान पळवापळवीवरून प्रकार
  धारदार शस्त्रास्त्रांचा वापर, 7 जण अटकेत
  परराज्यातून आलेल्या पुरोहितांकडून कृत्य
  त्रंबकेश्वरच्या पुरोहितांचा संबंध नाही - पुरोहित संघ

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स