LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासाभरानंतर बैठक संपली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | June 07, 2021, 20:05 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:59 (IST)

    पुणे - एसव्हीएस केमिकल कंपनी आग प्रकरण
    भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू
    कंपनीतील आग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
    'अहवालानंतर जबाबदारी निश्चित होईल'
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
    राज्य सरकारची मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत

    20:37 (IST)

    मुंबईच्या मधोमध विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग मोकळा, 'आरे'कडून वन विभागास मिळाला 812 एकर जागेचा ताबा

    20:20 (IST)

    उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेणार
    अजित पवार, अशोक चव्हाणही उपस्थित राहणार
    मराठा आरक्षणासंदर्भात बैठकीत चर्चा होणार
    शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये एक तास झाली बैठक
    उद्याच्या दिल्ली दौऱ्याआधी महत्वपूर्ण चर्चा
    मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मुद्यावर चर्चा
    लसीकरण आणि जीएसटी परताव्याबाबतही चर्चा
    अजित पवार, वळसे पाटील, एकनाथ शिंदे होते उपस्थित

    19:36 (IST)

    राज्यात दिवसभरात 21,081 कोरोनामुक्त
    राज्यात दिवसभरात 10,219 नवीन रुग्ण
    राज्यात दिवसभरात 154 रुग्णांचा मृत्यू
    रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.25, मृत्युदर 1.72%
    राज्यात सध्या 1 लाख 74,320 अॅक्टिव्ह रुग्ण

    19:32 (IST)

    पुणे - एसव्हीएस केमिकल कंपनीला मोठी आग
    आगीत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू
    मृतांमध्ये 15 महिला, 2 पुरुषांचा समावेश
    जेसीबीच्या सहाय्यानं काही मजुरांची सुटका
    कंपनीत काही मजूर अडकल्याची शक्यता
    प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
    भीषण आगीवर नियंत्रण, कुलिंगचं काम सुरू
    मुळशी तालुक्याच्या उरवडे गावातील घटना

    18:47 (IST)

    पुणे - पिंपरीतल्या एसव्हीएस कंपनीला आग
    भीषण आगीत 7 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
    कंपनीत 10-15 मजूर अडकल्याची शक्यता
    जेसीबीच्या सहाय्यानं काही मजुरांची सुटका
    प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
    अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण, कुलिंग सुरू
    मुळशी तालुक्याच्या उरवडे गावातील घटना

    17:39 (IST)

    देशवासीयांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज
    '18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार'
    'मोफत लसीकरणाला 21 जूनपासून सुरुवात'
    पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची घोषणा
    'लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्राची'
    'केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार'
    'खासगी रुग्णालयांना 25 टक्के लस मिळणार'
    दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत अन्नधान्य - मोदी
    '80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन'
    दर महिना मोफत धान्य मिळणार - पंतप्रधान
    'पीएम गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मदत'
    100 वर्षांतील ही मोठी महामारी - नरेंद्र मोदी
    आपण अनेकांना कोरोनामुळे गमावलो - मोदी
    दुसरी लाट अजून संपलेली नाही - नरेंद्र मोदी
    कोरोनाशी लढाई अद्याप सुरूच - पंतप्रधान
    'कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणं गरजेचं'
    कोरोना लस हे आपलं सुरक्षाकवच - मोदी
    कोरोनाविरोधातली लढाई जिंकणारच - मोदी

    15:5 (IST)

    मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 10 रेंजर गाड्या
    रेंजर गाड्यांचं पोलीस दलात आगमन
    मुंबई पोलीस दलात आधुनिक वाहनं
    मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर विशेष गाड्या
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण
    मुंबई पोलिसांना रिलायन्स फाऊंडेशनची भेट

    14:37 (IST)

    कोल्हापूरनंतर सोलापुरात धडकणार मराठा मोर्चा
    महाराष्ट्रात दुसरा मोर्चा सोलापुरात निघणार
    मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मोठा निर्णय

    14:22 (IST)

    मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत 4 दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा, सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेताना धोकादायक भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स