अमरावतीतील संतापजनक, धक्कादायक घटना
आदिवासी महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या
ओळख पटू नये यासाठी दगडानं ठेचला चेहरा
निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
शिरखेड पोलिसांनी दाखल केला गुन्हा
बलात्कार आणि खूनप्रकरणी आरोपीला अटक
20:17 (IST)
दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्युदर आणि सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात कमी, महाराष्ट्राच्या विविध प्रयत्नांमुळे कोरोना प्रतिबंधात यश
20:0 (IST)
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं 15 जून 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीची राबवली मोहीम, तपासणी दरम्यान 1.58 लाख प्रकरणं आढळून आली आणि त्यांच्यापासून 4.95 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केला
19:55 (IST)
शिवसेना संपणार नाही -संजय राऊत
'तर शिवसेना अधिक जोमानं येणार'
शिवसेना खासदार संजय राऊतांचं ट्विट
19:13 (IST)
अर्थमंत्र्यांनी काय अर्थसंकल्प दिला? -अजित पवार
'पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढतायत'
'नागपूरचा परिसर राष्ट्रवादीमय करायचाय'
'उपमुख्यमंत्रिपदाची संपूर्ण ताकद लावणार'
विदर्भालाही राष्ट्रवादीमय करायचंय -अजित पवार
19:4 (IST)
नागपूर - अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
'नागपूरची क्राईम कॅपिटल कशी झाली?'
कायदा सर्वांसाठी समान आहे -उपमुख्यमंत्री
'जनतेची इच्छा असल्यास चौकशी लावतो'
मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता -अजित पवार
17:38 (IST)
सातारा - कराडजवळ स्विफ्ट डिझायर कारला अपघात
भीषण अपघातात 4 जण जागीच ठार
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील घटना
17:32 (IST)
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कमी होतील अशी अपेक्षा, तेव्हा पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात येतील -प्रकाश जावडेकर
17:31 (IST)
हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा संकल्प; शेतकरी, गरीबांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध -प्रकाश जावडेकर
17:18 (IST)
भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या 6 बाद 257 धावा, भारत अजूनही 321 धावांनी पिछाडीवर
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स