Live Updates: 3 दिवसात दखल घेतली नाही तर पूर्ण नग्न होऊन आंदोलन, बीड ST कामगार आक्रमक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 06, 2021, 20:45 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:15 (IST)

  भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या दिल्लीत बैठक
  बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
  भाजपचे काही नेते व्हीसीद्वारे उपस्थित राहणार
  चंद्रकांत पाटील, विनय सहस्त्रबुद्धे व्हीसीद्वारे 
  खासदार हीना गावित, आशिष शेलार व्हीसीद्वारे
  दिल्लीतील बैठक सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत 

  22:6 (IST)

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ
  देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
  अनिल देशमुखांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी 

  21:16 (IST)

  मुंबई - कांदिवलीतील एका इमारतीत भीषण आग
  मथुरादास रोडवरील परम गोल्ड इमारतीत आग
  अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही 

  19:20 (IST)

  धुळे राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांचा खुलासा
  'ड्रग्ज प्रकरणात सुनील पाटील नाव चर्चेत'
  'सुनील पाटील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही'
  'सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी संबंध नाही'
  धुळे राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांचा खुलासा
  'सुनील पाटील राष्ट्रवादीचा सदस्यही नाही'
  'कोणत्याही नेत्यांशी किंवा मंत्र्यांशी संबंध नाही'
  बदनामीसाठी षड‌्यंत्र; किरण शिंदेंचा आरोप 

  19:3 (IST)

  अहमदनगर - सिव्हिल रुग्णालयातील आग प्रकरण
  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवारांची घटनास्थळी भेट
  आग लागलेल्या कक्षाची पाहणी करून घेतली बैठक
  'आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश'
  चौकशी समिती नेमली आहे - डॉ.भारती पवार
  'समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करू'
  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केलं स्पष्ट 

  17:13 (IST)

  आशिष शेलार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
  'अतिशय गंभीर स्वरूपाच्या गोष्टी पुढे येत आहेत'
  'राज्य कोणत्या दिशेनं चाललंय हेच कळत नाही'
  साक्षीदारांवरील हल्ले वाढत चालले - आशिष शेलार
  राज्य सरकार अराजकतेच्या दिशेनं - आशिष शेलार
  चिंकू पठाण 'सह्याद्रीवर' भेटतो - आशिष शेलार
  'सह्याद्री' वसुलीचा अड्डा आहे का? - आशिष शेलार
  'सुनील पाटीलबाबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सांगावं'
  'आम्ही सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही'
  आर्यन खानप्रकरणी एकपात्री प्रयोग सुरू - शेलार 

  16:58 (IST)

  मुंबई - गोरेगावमधील खंडणी प्रकरण
  सचिन वाझेच्या पोलीस कोठडीत वाढ
  सचिन वाझेला 7 दिवसांची पोलीस कोठडी
  वाझेच्या पोलीस कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ

  'माझी पोलीस कोठडी वाढवून द्यावी'
  सचिन वाझेचीच सत्र न्यायालयात मागणी
  गोरेगाव खंडणी प्रकरणी सचिन वाझे अटकेत
  पोलिसांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी
  कोठडीसाठी वाझेचा स्वतःहून कोर्टात होकार
  मला वाढीव पोलीस कोठडी मंजूर - वाझे  

  16:21 (IST)

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच
  एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी
  एसटी कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम
  मुंबई हायकोर्टात सोमवारी होणार सुनावणी

  16:21 (IST)

  मुंबई - गोरेगावमधील खंडणी प्रकरण
  सचिन वाझेच्या पोलीस कोठडीत वाढ
  सचिन वाझेला 7 दिवसांची पोलीस कोठडी

  'माझी पोलीस कोठडी वाढवून द्यावी'
  सचिन वाझेचीच सत्र न्यायालयात मागणी
  गोरेगाव खंडणी प्रकरणी सचिन वाझे अटकेत
  पोलिसांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी
  कोठडीसाठी वाझेचा स्वतःहून कोर्टात होकार
  मला वाढीव पोलीस कोठडी मंजूर - वाझे 

  15:54 (IST)

  नगर - सिव्हिल रुग्णालयातील आग प्रकरण
  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
  ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. - आरोग्यमंत्री
  मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे- राजेश टोपे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स