LIVE: चांदवड शहर परिसरात मुसळधार पाऊस, काही भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 06, 2021, 17:39 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:45 (IST)

  जम्मू-काश्मीरच्या पुलवाम्यात पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला, बस स्थानक परिसरात दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, 6 ते 7 नागरिक जखमी

  20:0 (IST)

  राज्यात दिवसभरात 14,433 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 12,557 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 233 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95.05, मृत्युदर 1.72%
  राज्यात सध्या 1 लाख 85,527 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:52 (IST)

  कोरोनाचं आव्हान कायम - उद्धव ठाकरे
  'राज्यातील निर्बंध शिथिल केलेले नाहीत'
  'जिल्हा प्रशासनानं परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा'
  'कुठेही गर्दी, नियम तोडलेले चालणार नाहीत'
  मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना सूचना
  कोणत्याही दबावाला बळी पडू नका - मुख्यमंत्री
  '...तर स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लावा'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश

  19:24 (IST)

  पुण्यात दिवसभरात 549 कोरोनामुक्त
  पुण्यात दिवसभरात 297 रुग्णांची भर
  पुण्यात दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू

  17:15 (IST)

  संभाजीराजे आणि मराठा समन्वयकांमध्ये झाली बैठक
  येत्या 16 जूनपासून राज्यात एल्गार - संभाजीराजे
  आमचा लढा कोणाच्या विरोधात नाही - संभाजीराजे
  'आमच्या 5 मागण्या आहेत त्या पूर्ण करा'
  'जनतेला वेठीस कोण धरतंय, हे सरकारला विचारा'
  'सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका महत्वाची'
  'आरक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज'
  दोन्ही राजे एकत्रच, काही वेगळं नाही - संभाजीराजे
  'मराठा समाजाला न्याय द्या, हीच आमची भूमिका'
  सगळ्यांनी राजेंना पाठिंबा दिला - मराठा समन्वयक
  कोल्हापुरात सर्व समन्वयक जाणार - मराठा समन्वयक
  'कोल्हापूरमधील आंदोलन यशस्वी करणार'
  36 जिल्ह्यांत हे आंदोलन होणार - मराठा समन्वयक
  'मागण्या मान्य न झाल्यास पुणे, मुंबईत आंदोलन'
  तिसरी लाट मराठ्यांची असेल - मराठा समन्वयक
  'राजेंवर वैयक्तिक टीका नको, अन्यथा प्रत्युत्तर देऊ'
  मराठा समाज आता शांत बसणार नाही - समन्वयक
  'संभाजीराजेंवर टीका म्हणजे मराठा समाजावर टीका'
  'आरक्षण देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची?'
  'मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचा प्रयत्न'
  'आता जबाबदारी निश्चित करण्याची गरज'
  मराठा समन्वयकांची आक्रमक भूमिका

  16:43 (IST)

  'संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या घोषणेचं स्वागत'
  'रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांचं समर्थन'
  मराठा आंदोलनात सहभागी होऊ - चंद्रकांत पाटील
  अजित पवारांवर चंद्रकांत पाटलांची टीका
  अजित पवारांच्या बोलण्यात दांभिकपणा - पाटील

  16:26 (IST)

  अमरावती - मेळघाटातील 'त्या' बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू, बाळ आजारी असल्यानं आजीनं पोटावर अंधश्रद्धेतून दिले होते चटके

  15:33 (IST)

  पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
  काँग्रेस सोमवारी पुकारणार राज्यव्यापी आंदोलन
  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती
  एकाच वेळी 1 हजार ठिकाणी होणार आंदोलन

  15:13 (IST)

  मान्सून पुण्यात दाखल; अलिबाग, रायगड, मराठवाड्यातही बरसणार, भारतीय हवामान विभागाची माहिती

  15:7 (IST)

  कोविड संदर्भात प्रमुख उद्योजकांसोबत केली चर्चा
  लॉकडाऊन, नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री
  'कोरोना काळातही काळजी घेऊन उद्योग चालवले'
  असं उदाहरण देशात निर्माण करायचं आहे - मुख्यमंत्री
  चित्रपट, मालिकांच्या निर्मात्यांसोबतही केली चर्चा

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स