LIVE : केंद्राकडून स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ स्थापन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | July 06, 2021, 22:30 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:27 (IST)

    नागपूर - रामटेकमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू
    मृतांमध्ये पोलीस पाटील, मजूर, गुराख्याचा समावेश

    19:24 (IST)

    कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश
    कृपाशंकर माजी गृहराज्यमंत्री, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष
    चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
    देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर उपस्थित राहणार
    दुपारी 12 वाजता प्रदेश कार्यालयात होणार प्रवेश

    19:20 (IST)

    मुंबईतही हिरव्या बुरशीचे रुग्ण सापडले
    KEM मध्ये 8 रुग्णांवर उपचार, 2 रुग्ण भरती
    कोरोनामुक्त रुग्ण हिरव्या बुरशीनं बाधित
    म्युकरमायकोसिसपेक्षाही भयानक हिरवी बुरशी

    19:13 (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हालचालींना वेग
    राज्यातून राणे, कपिल पाटलांचं नाव चर्चेत
    ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवालही दिल्लीत
    मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता
    उद्या संध्याकाळी 6.30 वाजता शपथविधी?
    जवळपास 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता
    मोदी आज रात्री राष्ट्रपती भवनात यादी पाठवणार?

    18:53 (IST)

    मराठा आरक्षणासाठी 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळवण्याचा ठराव, 2014 च्या SEBC उमेदवारांना मोठा दिलासा, तात्पुरत्या नियुक्त्या व वयोमर्यादेत वाढ
    लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत 15 हजार 515 वर्ग एक आणि वर्ग दोनची पदं भरणार, आयोगातील सदस्यांची 

    रिक्त पदं 31 जुलैपर्यंत भरणार, केंद्राच्या शेतकरी कायद्यात सुधारणा करून नवं विधेयक सादर
    आरोग्य विभागास प्राधान्यानं निधी, कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव, लसीकरण दरमहा वाढीव 3 कोटी डोस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव
    23 हजार 149 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वाधिक निधी

    18:46 (IST)

    पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचं समाधान, 9 विधेयकं दोन्ही सभागृहात संमत - मुख्यमंत्री

    18:29 (IST)

    विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
    लोकशाहीत चर्चेला महत्व आहे - मुख्यमंत्री
    'विधिमंडळ हा कुस्तीचा आखाडा नाही'
    'राज्याच्या परंपरेला लाजवणारा 'तो' प्रकार'
    शिवीगाळ करणं हे कितपत योग्य? - सीएम
    'काल-आज जे घडलं त्याबद्दल लाज वाटते'
    'जनता स्वप्न पाहते, त्याला तडा देऊ नका'
    'गैरवर्तन केलेल्या आमदारांचं निलंबन केलं'
    'केंद्राकडून माहिती मागवण्यात गैर काय?'
    'मुद्दा काय होता, केंद्राकडून डेटा मागण्याचा'
    मग मिरच्या का झोंबल्या? विरोधकांना टोला
    'ईडी, CBI ची कारवाई हे दबावतंत्र नाही का?'
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर घणाघात
    'सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न अयशस्वी'
    'भाजपचा सरकारविरोधी द्वेष उफाळून आला'
    'पुरेसा साठा न मिळाल्यानं लसीकरण थांबलं'
    आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर - मुख्यमंत्री
    जनहिताचे निर्णय घेतल्याचं समाधान - मुख्यमंत्री
    9 विधेयकं दोन्ही सभागृहात संमत - मुख्यमंत्री
    'मराठा आरक्षणासाठी 50% मर्यादा शिथिल करावी'
    केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव - मुख्यमंत्री
    'OBC आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा मिळवण्याचा ठराव'


    2 दिवसांत अनेक बिलं मंजूर केली - अजित पवार
    'समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न'
    'एमपीएससी आयोगातील सर्व पदं भरणार'
    MPSCच्या 15,511 रिक्त पदं भरणार - अजित पवार
    'महामंडळांना शक्य ती मदत देण्याचा प्रयत्न'
    'मराठा आरक्षणाबाबत महत्वाची चर्चा केली'
    'OBC आरक्षण गेल्यानं 56 हजार जागा कमी झाल्या'
    'शेतकऱ्यांना न्याय देणारं कृषी बिल मांडलं'
    'भूमिका झोंबल्यानं भाजप आमदारांचा गदारोळ'
    अधिवेशनाला काळिमा फासणारी घटना - अजित पवार
    पवित्र मंदिराचा अपमान केला - अजित पवार
    आमदारांनी गोंधळ घातल्यानं कारवाई - अजित पवार
    'त्या बाराचा आणि या बाराचा काहीही संबंध नाही'

    17:41 (IST)

    लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकरांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

    17:31 (IST)

    एमपीएससी आयोगातील सर्व पदं भरणार - अजित पवार
    15 हजार 511 रिक्त पदं भरणार - अजित पवार
    'UPSCच्या धर्तीवर MPSC मुलाखतीचा मानस'
    'MPSC चं वेळापत्रक 1 वर्ष आधी जाहीर करणार'
    'कृषी विधेयकावर प्रतिक्रियेसाठी 2 महिने अवधी'
    'दर महिना केंद्रानं 3 कोटी लस उपलब्ध करावी'
    लसीचे वाढीव डोस राज्याला मिळावेत - अजित पवार
    '2 दिवसांच्या अधिवेशनात महत्वाचे ठराव केले'
    सभागृहाचं पावित्र्य नेहमीच राखलं गेलं - अजित पवार
    'सभागृहातील कालचा प्रकार अशोभनीय'
    काल विरोधी पक्षाचा तोल गेला - अजित पवार
    काही सीनियर मंत्र्यांनी वर्तन केलं - अजित पवार
    'कालचा गोंधळ कमी, म्हणून आज प्रतिविधानसभा'
    पवित्र मंदिराचा अपमान केला - अजित पवार
    'भाजप आमदारांचं स्वत:वर नियंत्रण राहिलं नाही'
    'काहीजण भास्कर जाधवांच्या अंगावर धावून गेले'
    'तालिका अध्यक्ष जाधवांचा मनाचा मोठेपणा'
    'विरोधी पक्षाचा सारवासारव करण्याचा प्रयत्न'
    'जीएसटी परतावा 30 हजार कोटी येणं बाकी'
    'संजय गांधी निराधार योजनेला निधी दिला'
    महामंडळांना भरीव निधी द्यावा - अजित पवार
    'त्या बाराचा आणि या बाराचा संबंध नाही'

    17:17 (IST)

    2 दिवसांत राज्याच्या हिताचं काम केलं - सीएम
    काल जे घडलं ते अशोभनीय - उद्धव ठाकरे
    'महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणारा प्रकार'
    'माझ्या पहिल्याच टर्ममध्ये असा अनुभव आला'
    'विरोधकांनी सभागृहात बाजू मांडायला हवी होती'
    हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही - सीएम
    'प्रत्येकानं मर्यादा पाळाव्या यावर चिंतन व्हावं'
    विरोधकांच्या वर्तनाचा सर्वांनाच धक्का - सीएम
    सत्ता एके सत्ता हा अट्टहास कशासाठी? - सीएम
    जे घडू नये ते घडलं, त्यांनी सुधारावं - सीएम
    बोगस लसीकरण हा जीवघेणा प्रकार - सीएम
    'बोगस लस प्रकरणात कडक कारवाई होणार'
    लसीकरणाचा साठा सुरळीत नाही - सीएम
    'लस मिळाल्यावर लसीकरणाचा वेग वाढवणार'
    'परिस्थिती आटोक्यात आल्यावर निवडणूक'
    'विधानसभा अध्यक्षपद निवड योग्य वेळीच घेऊ'
    जनतेच्या जीवाशी खेळणार नाही - सीएम
    'इम्पेरिकल डेटा मिळावा अशी मागणी'
    'मुद्दा काय होता, केंद्राकडून डेटा मागण्याचा'
    मग मिरच्या का झोंबल्या? विरोधकांना टोला
    'मराठा-ओबीसींचं हित साधायचं नाही'
    मग विरोधकांना हवं काय? - उद्धव ठाकरे
    'ओबीसीची केंद्राकडून माहिती मागितली'
    हा आमचा अपराध आहे का? - सीएम
    'ओबीसी आरक्षणाची केंद्र माहिती देत नाही'
    'काल जे घडलं आहे ते आपल्यासमोर आहे'

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स