liveLIVE NOW

LIVE Updates: 'भाजप सरकारच्या काळात शेतमालाला भाव नाही'- शरद पवार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 05, 2021, 16:15 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:1 (IST)

  राज्यात दिवसभरात 4 हजार 57 नव्या रुग्णांची भर
  राज्यात 5,916 कोरोनामुक्त तर 67 जणांचा मृत्यू

  21:11 (IST)

  अनिल देशमुखांविरोधात लूकआऊट नोटीस - सूत्र
  ईडीच्या सूत्रांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  देश सोडून जाता येणार नाही, ईडीची नोटीस
  दिसताच क्षणी देशमुखांना अटक होणार - सूत्र
  अनेक वेळा चौकशीला बोलावूनही आले नाहीत
  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

  18:30 (IST)

  उद्या दुपारी 3 वाजता 'वर्षा'वर होणार बैठक
  मुख्यमंत्री आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा होणार

  17:58 (IST)

  राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारकडून दखल
  नृसिंहवाडीत प्रांताधिकाऱ्यांनी दिलं प्रस्तावाचं पत्र
  राजू शेट्टींनी प्रशासनाचं निवेदन स्वीकारलं
  स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजू शेट्टी आक्रमक
  पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी सरकारकडे साकडं
  पुरामुळे आयुष्य उद‌्ध्वस्त होण्याची वेळ - शेट्टी
  'पूर टाळण्यासाठी योग्य उपाययोजना हव्यात'

  17:13 (IST)

  राजू शेट्टी लढाऊ आहेत, पूरग्रस्तांना मदत मागितली, त्याच्याशी सहमत आहे - चंद्रकांत पाटील

  16:56 (IST)

  कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती नाही - चंद्रकांत पाटील
  आमचा विश्वासघात झाला, चंद्रकांत पाटलांची टीका
  'कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली...'
  'मुंबईसह इतर पालिका निवडणुका पुढं ढकलण्याचा डाव'
  राज ठाकरे, अण्णा हजारे बोलू लागलेत - पाटील
  'सर्व शक्ती रस्त्यावर उतरवून खोटेपणा उघडा करू'
  चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारवर निशाणा
  'संजय राऊत हे शरद पवारांसाठी काम करतायत'
  'राष्ट्रवादी सेनेच्या ताब्यातील पं.स. खात सुटलीय'
  'अनिल परबांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसात तक्रार'
  कारवाई न केल्यास कोर्टात जाऊ - चंद्रकांत पाटील

  16:37 (IST)

  उल्हासनगर - बंदी असलेला थर्मकॉल विकणाऱ्या दुकानावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धाड, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मखर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय थर्मकॉल

  16:28 (IST)

  कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
  नदीत उड्या मारणाऱ्या कार्यकर्त्यांना वाचवण्यात यश
  'पूरग्रस्तांना 2019 च्या निकषाप्रमाणे मदत मिळावी'
  नृसिंहवाडीत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

  15:49 (IST)

  पुण्यातल्या ग्रामीण भागातील मोक्याच्या जागा
  'त्या हडपण्यासाठी 23 गावं पालिकेत समाविष्ट'
  चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारवर हल्लाबोल

  15:46 (IST)

  'भाजप सरकारच्या काळात शेतमालाला भाव नाही'
  शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ - शरद पवार
  जुन्नरमधील दौऱ्यात पवारांचा केंद्रावर घणाघात

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स