Live Updates: अनिल देशमुखांना उद्या कोर्टात हजर केले जाणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | November 05, 2021, 22:33 IST |
    LAST UPDATED A YEAR AGO

    हाइलाइट्स

    21:12 (IST)

    (FINAL CORRECT NEWS) 
    'समीर वानखेडेच करणार आर्यन प्रकरणाचा तपास'
    'कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याला हटवलेलं नाही'
    जे तपास अधिकारी होते तेच तपास करणार - NCB
    'फक्त संजय सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक'
    'संजय सिंगांकडे 6 प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी'
    'IPS संजय सिंग यांच्या नेतृत्वात तपास होणार'
    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं स्पष्ट 

    17:38 (IST)

    पुणे - गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत
    वडगाव काशिंबे, गिरवली गावात बैलगाडा शर्यत
    शर्यतीला बैलगाडा मालकांसह तरुणांची गर्दी
    बंदी असतानाच गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात शर्यत
    बैलगाडा शर्यतीकडे मंचर, घोडेगाव पोलिसांचं दुर्लक्ष 

    17:38 (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच
    एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी
    कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम
    मुंबई हायकोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी 

    17:5 (IST)

    बिहारमध्ये ऐन दिवाळीत विषारी दारूचे 31 बळी
    गोपाळगंज आणि बेतिया परिसरातील घटना
    विषारी दारू प्राशन केल्यानं गमावले प्राण 

    17:5 (IST)

    अफगाणिस्तान संदर्भात 10 नोव्हेंबरला दिल्लीत बैठक
    NSA अजित डोवाल बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार
    रशिया, इराण, म.आशियातील देशांचा सहभाग निश्चित
    चीन आणि पाकिस्तानलाही पाठवलं होतं निमंत्रण
    पाकनं मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण नाकारलं

    17:4 (IST)

    सचिन वाझेकडील 25 प्रकरणांचा तपास थांबवला; वाझे तपास करत असलेली बहुसंख्य प्रकरणं संशयास्पद असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस विभागाचा निर्णय 

    17:4 (IST)

    मनसे अध्यक्षांचा उद्या नव्या घरी गृहप्रवेश 
    राज ठाकरे नव्या घरात राहायला जाणार
    'कृष्णकुंज'च्या शेजारी 5 मजली बंगला
    राज ठाकरे सहकुटुंब गृहप्रवेश करणार 

    16:35 (IST)

    पुणे - किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत वाढ
    कोर्टाकडून आणखी 3 दिवस पोलीस कोठडी
    गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ 

    13:21 (IST)

    आर्यन खाननं ईडी कार्यालयात लावली हजेरी
    जामीन देताना दर शक्रवारी हजेरी लावण्याची अट

    13:10 (IST)

    पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी
    वरवे-कोंडणपूर दरम्यान मोठी वाहतून कोंडी
    10 ते 12 किमीच्या वाहनांच्या रांगा 
    पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर कोंडी
    वाहतूक कोंडीमुळे खेड-शिवापूर टोल मोकळा

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स