LIVE: शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 05, 2021, 23:36 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:55 (IST)

  राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
  राज्यात दिवसभरात 21,776 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 13,659 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 300 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95 टक्के
  राज्यात सध्या 1 लाख 96,894 अॅक्टिव्ह रुग्ण 

  19:18 (IST)

  मविआ सरकारमध्ये समन्वय नाही - चंद्रकांत पाटील
  मविआ सरकारमधील मंत्र्यांमध्ये विसंवाद - पाटील
  'मराठा आरक्षणप्रश्नी पुनर्विचार याचिका दाखल करा'
  मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही - पाटील
  आरक्षणप्रश्नी सरकारची चालढकल - चंद्रकांत पाटील
  'मराठ्यांबाबत जे झालं तेच ओबीसींबाबतही होतंय'
  आरक्षणावरून चंद्रकांतदादांचा सरकारवर हल्लाबोल
  'सारथी'वरून अजित पवारांवरही साधला निशाणा
  'अजित पवारांनी सारथी संस्था स्वत:कडे घेतली'
  'अजूनही लाभार्थी मुलांचे स्टायपंड थकलेले आहेत'
  फक्त प्रशासकीय विस्तारावर भर - चंद्रकांत पाटील
  'सारथी अजित पवारांकडे येऊन 9 महिने झाले'
  मात्र पुढे काहीच झालं नाही? - चंद्रकांत पाटील 

  19:18 (IST)

  छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळा
  'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांनी रायगडावर येऊ नये'
  'शिवराज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करावा'
  खासदार संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन
  संभाजीराजे छत्रपतींचं कार्यकर्त्यांना आवाहन
  मराठा आरक्षणप्रश्नी उद्या बोलणार - संभाजीराजे
  संभाजीराजे छत्रपती मोठी घोषणा करण्याची शक्यता 

  15:23 (IST)

  अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल
  पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल
  हवामान खात्याची ट्विटरवरून माहिती

  14:53 (IST)

  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे LIVE
  बीड - मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार
  आजचा मोर्चा सर्व जाती-धर्माचा - मेटे
  'हा अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा'
  'सरकार अंगावर आलं तर शिंगावर घेऊ'
  'ही लढाई गरीबांची आहे, श्रीमंतांची नाही'
  मराठा समाजाला वाऱ्यावर सोडू नका - मेटे
  'अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण घालवलं'
  'चव्हाणांचा राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच'
  'सरकारनं 5 जूनपर्यंत मागण्या पूर्ण कराव्यात'
  '...अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही'
  विनायक मेटेंचा राज्य सरकारला इशारा

  14:1 (IST)

  मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गूढ कायम
  'मनसुख हिरेन यांच्यावर विषप्रयोग नाही' 
  'शरीरात कोणतंही विषद्रव्य आढळलं नाही' 
  मनसुख यांच्या व्हिसेरा अहवालातून माहिती

  12:32 (IST)

  बीड - मराठा आंदोलकांची मोटारसायकल रॅली
  आंदोलक मोटारसायकल रॅलीनं जिल्हा स्टेडियमवर
  प्रशासनानं जिल्हा क्रीडा स्टेडियम उघडलं

  11:32 (IST)


  अनलॉकबाबत कुठलंही नियोजन नाही - दरेकर
  सरकारची भूमिका मंदिरांविरोधात - प्रवीण दरेकर
  वारकरी दिंडीसाठी आक्रमक झालेत - दरेकर
  'पक्षाचे मेळावे चालतात, मंदिरांना विरोध का?'
  लसीकरणाचं मुंबई मॉडेल फेल गेलं - दरेकर 

  11:32 (IST)

  अकोला जिल्हाधिकाऱ्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक
  अकाऊंटवरून नागरिकांकडे पैशांची मागणी
  जिल्हाधिकाऱ्यांनी केली सायबर सेलकडे तक्रार

  8:40 (IST)

  डोनाल्ड ट्रम्प यांचं फेसबुक अकाऊंट सस्पेंड
  ट्रम्प यांच्यावर नियमभंग केल्याचा ठपका

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स