LIVE Updates : पुण्यात विजांच्या कडकडाचा कहर, मुसळधार पाऊस!

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 04, 2021, 19:43 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  20:41 (IST)

  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल, भाजपच्या विजयानं राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा विश्वास

  20:28 (IST)

  मुंबई-दिल्ली हायवेला थेट समुद्रात पूल बांधून नरीमन पॉईंटला जोडायची माझी योजना, 1 लाख कोटींचा हा प्रकल्प - नितीन गडकरी

  20:26 (IST)

  गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांत सहमती न झाल्यानं समुद्राला पाणी जातंय, मी मध्यस्थी करायला तयार - नितीन गडकरी

  20:23 (IST)

  कारगिलखाली उणे 6 तापमान आहे, त्या जागी आशियातील सगळ्यात मोठी टनेल बांधायचं काम सुरू, 2026 पर्यंत पूर्ण होणार, सुरत-चेन्नई ग्रीन महामार्ग हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा, प्रदूषण 50 टक्के कमी होणार, रस्त्यावर 8 इंचाचं व्हाईट टोपिंग केलं तर खड्डे पडणार नाहीत, राज्य सरकारनंही हा प्रयोग करावा - नितीन गडकरी

  20:9 (IST)

  नागपूर - काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पॅनलचा पराभव
  भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलचा विजय

  20:8 (IST)

  नागपूर - काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पॅनलचा पराभव
  भाजपच्या शेतकरी उत्कर्ष सहकार पॅनलचा विजय

  19:57 (IST)

  महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रम देशाला दिशा देणारा प्रकल्प; 

  जैव विविधतेचं जतन, संशोधन करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणार

  , जनुक कोष कार्यक्रमाचा कार्यपूर्ती अहवाल सादर - मुख्यमंत्री

  19:4 (IST)

  अखेर एमपीएससीचं नवीन वर्षाचं परीक्षा वेळापत्रक रुळावर, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाकडून प्रसिद्ध; 

  उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी सहाय्यक करआयुक्त, बीडीओ, वित्त लेखाधिकारी अशा विविध संवर्गातील एकूण 290 पदांसाठी 

  राबवली जाणार भरती, राज्यसेवा परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानं MPSC परीक्षार्थींना मोठा दिलासा

  18:55 (IST)

  अंमली पदार्थ तस्कर ताब्यात, एनसीबीची कारवाई
  डार्क नेटद्वारे अंमली पदार्थ विकले होते
  बीटकॉईनच्या माध्यमातून पैसे घेतले होते

  18:52 (IST)

  नाशिक - राष्ट्रीय महामार्गावरील 630 किमी लांबीच्या रुपये 2048 कोटींच्या प्रकल्पाचा शुभारंभ, डिजिटल पद्धतीनं नितीन गडकरींनी केलं उद‌्घाटन

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स