Live Updates: 130 रशियन बस भारतीय विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सज्ज

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 04, 2022, 13:35 IST
  LAST UPDATED 7 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:58 (IST)

  मुंबई - भांडुपच्या ड्रीम्स मॉलला आग
  मॉलमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली
  अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी
  गेल्या वर्षभरापासून ड्रीम्स मॉल बंद

  21:55 (IST)

  मुंबईतील कूपरेज बँडस्टँड उद्यान इथं एनसीपीए अॅट दी पार्क संगीत आणि कला महोत्सवाला प्रारंभ, बृहन्मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचा उपक्रम

  21:50 (IST)

  मुंबईतील कूपरेज बँडस्टँड येथे  एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सवास प्रारंभ

  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचा उपक्रम

  20:38 (IST)

  संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना
  एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह विहिरीत सापडले
  चिमुकल्यासह 2 मुली, आईचा मृतदेह आढळला
  आत्महत्या की घातपात? पोलीस करणार तपास

  19:45 (IST)

  ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन
  हृदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन
  महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन
  वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड

  19:1 (IST)

  - ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका नको यासाठी कॅबिनेटमध्ये सुरू आहे चर्चा
  - मध्य प्रदेशचा धर्तीवर महाराष्ट्र सरकार कायदा बनवण्यासाठी एकमत
  - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रभाग रचना बनवण्याचे अधिकार
  - मध्य प्रदेश राज्य सरकारच्या पावलावर,महाराष्ट्र सरकारचे पाऊल
  - मध्यप्रदेश सरकारचा आहे असा कायदा
  - ओबीसी आरक्षण प्रश्न निर्माण झाल्यानंतर मध्यप्रदेश सरकारने केला कायदा
  - या निर्णयामुळे लांबल्या निवडणुका
  - आजच्या कॅबिनेट बैठकीत होतोय हा निर्णय
  - बहुमताच्या जोरावर,हाऊसमध्ये करणार मंजूर 
  - मंजुरीनंतर पाठवणार राज्यपालांकडे
  - विरोधकांवर कुरघोडी करण्याची रणनिती

  18:24 (IST)

  धारावी पुनर्विकास योजना घोटाळा प्रकरण
  'तत्कालीन फडणवीस सरकारची चौकशी करा'
  नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
  योग्य करार न करताच 800 कोटी खर्चाचा आरोप
  घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा - पटोले

  18:17 (IST)

  नवाब मलिक विरुद्ध वानखेडे कुटुंब वाद
  मलिकांना नागपूर खंडपीठाचा झटका
  समीर वानखेडेंच्या भावानं केली होती याचिका

  18:12 (IST)

  - राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात सुरु
  - मुख्यमंत्री या बैठकीला दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित
  - तर इतर मंत्रीगण प्रत्यक्ष हजर
  - या मंत्रिमंडळ बैठकित 2 विषयांवर होणार चर्चा
  - महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणी पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या रचनेविषयी सुधारणा करण्याबाबत.
  - मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती,औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्याबाबत

  18:10 (IST)

  'मोदींसमोर गनिमी काव्यानं आंदोलन करणार'
  पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
  मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाही - प्रशांत जगताप
  'केवळ 5 किमीवरील काम घिसाडघाईनं पूर्ण'
  'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद‌्घाटन होतंय'
  पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भाजपवर आरोप

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स