LIVE NOW

LIVE : पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण राहणार बंद, लशीअभावी महापालिकेचा निर्णय

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | May 3, 2021, 9:58 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 3, 2021
auto-refresh

Highlights

9:58 pm (IST)

नागपूर - सातनवरी इथं इंडस पेपर मिलला आग
मागच्या 4 तासांपासून अग्नितांडव सुरूच
कागद, खरडे असल्यानं आगीनं घेतलं रौद्र रूप
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
इंडस पेपर मिलची आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

8:21 pm (IST)

पुण्यात मंगळवारीही कोरोना लसीकरण बंद राहणार
लस न आल्यानं पुणे महापालिकेचा निर्णय
लसीकरण बंद असण्याचा उद्या चौथा दिवस

8:00 pm (IST)

पुण्यात दिवसभरात 2579 नवे रुग्ण
पुण्यात दिवसभरात 4046 रुग्णांना डिस्चार्ज
पुण्यात दिवसभरात 79 रुग्णांचा मृत्यू

7:55 pm (IST)

प्रत्येकाला लस पुरवण्यासाठी कटिबद्ध - पुनावाला
'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला'
अदर पुनावाला यांचं ट्विटरवरून स्पष्टीकरण
'पुढील काही महिन्यांत 11 कोटी डोस देणार'

 

7:51 pm (IST)

राज्यासाठी दिलासादायक, सकारात्मक बातमी
राज्यात दिवसभरात 59,500 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 48,621 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू
राज्यात सध्या 6 लाख 56,870 ॲक्टिव्ह रुग्ण

 

7:36 pm (IST)

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा काहीसा दिलासा
बाधित रुग्णसंख्या कमी, बरं होण्याचं प्रमाण वाढलं
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 2720 नवे रुग्ण
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3583 कोरोनामुक्त
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 32 जणांचा मृत्यू

7:23 pm (IST)

आरोग्य विभागाची मायक्रो प्लॅनिंग कमिटी
कमिटीनं काय प्लॅनिंग केलं? - प्रवीण दरेकर
'इतर राज्यांची सिरम आणि बायोटेककडे बुकिंग'
'आपण किती बुकिंग केली व रक्कम अदा केली?'
'ग्लोबल टेंडरचं काय झालं? जनतेला माहिती द्या'
वि.प.चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल

6:34 pm (IST)

अदर पुनावालांना आरोग्यमंत्र्यांची भावनिक साद
'लस पुरवठ्यात महाराष्ट्राला झुकतं माप द्यावं'
राजेश टोपेंचं 'सिरम'ला भावनिक आवाहन
'स्पुटनिक लस विकत घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'

 

6:26 pm (IST)

वर्ध्यात कोव्हॅक्सिनचं लसीकरण बंद
लस संपल्यानं कालपासून लसीकरण केंद्र बंद
शहरातील 4 केंद्रांवरून दिली जात होती लस
वर्ध्यात लस येईपर्यंत राहणार लसीकरण बंद
सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

6:12 pm (IST)

वाढत्या कोरोनाला अटकाव घालण्यास केंद्रानं देशभरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतल्यास राज्य सरकार त्याबाबत अनुकूल राहणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स