LIVE : बदलापूर एमआयडीसीत वायू गळती झाल्याची माहिती; नागरिकांना श्वास घेण्यास होतोय त्रास

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | June 03, 2021, 22:50 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    20:15 (IST)

    जो जीआर काढलाय त्याबद्दल उदय सामंतांचं अभिनंदन, शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण होण्याचा पहिला टप्पा आहे, शाळांमध्येही अशाच प्रकारे साजरा व्हावा - संभाजीराजे छत्रपती

    20:15 (IST)

    6 जून हा दिवस सर्व कॉलेज, विद्यापीठात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जाणार, त्या जीआरची प्रत त्यांना दिली, कुठलीही राजकीय भेट नव्हती - उदय सामंत

    20:4 (IST)

    राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत 4 लाख 60 हजार 881 कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास मंजुरी, एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीनं वित्तपुरवठा करावा - मुख्यमंत्री

    19:48 (IST)

    मुंबईत दिवसभरात 961 नवीन रुग्ण
    मुंबईत दिवसभरात 897 कोरोनामुक्त
    मुंबईत दिवसभरात 27 रुग्णांचा मृत्यू

    19:34 (IST)

    काय सुरू, काय बंद? - देवेंद्र फडणवीस
    कुठे आणि केव्हापर्यंत? - देवेंद्र फडणवीस
    लॉक की अनलॉक? - देवेंद्र फडणवीस
    पत्रपरिषद की प्रेस रिलीज - फडणवीस
    अपरिपक्वता की श्रेयवाद - फडणवीस
    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

    19:30 (IST)
    ही गफलत नाही; मंत्री वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण
    पाच लेव्हलला मान्यता दिलेली आहे - वडेट्टीवार
    'ज्या भागातील जनतेनं सहकार्य केलेलं आहे'
    तिथलं लॉकडाऊन कमी करायचं ठरवलंय - वडेट्टीवार
    'या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे'
    टप्प्याटप्यानं मान्यता दिलेली आहे - विजय वडेट्टीवार
    19:3 (IST)

    अनलॉकच्या मुद्यावरून सरकारमध्येच गोंधळ
    मंत्री विजय वडेट्टीवारांनी केली होती घोषणा
    अजून मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब होणं बाकी

    18:6 (IST)

    'मुंबईत 6% पॉझिटिव्ह रेट, आपण झोन 2 मध्ये'
    अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींची माहिती
    'मुंबईवासीयांना मॉर्निंग वॉक करता येणार'
    'लोकल मात्र सर्वसामान्य जनतेला खुली नाही'
    दुकानांची व्यवस्था तीच असेल - सुरेश काकाणी
    लसीकरण उद्यपासून पुन्हा सुरू होणार - काकाणी

    16:49 (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे 3 बळी
    पोल्ट्रीची भिंत कोसळून 3 जणांचा जागीच मृत्यू
    गडहिंग्लजच्या मुगळी इथं पोल्ट्रीची भिंत कोसळली
    आडोसा घेण्यासाठी पोल्ट्रीजवळ थांबले होते
    कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं

    15:56 (IST)

    रावसाहेब दानवेंची मविआ सरकारवर टीका
    'मराठा समाजाला आरक्षण दिलेलं ते यांनी घालवलं'
    'मागासवर्गीय आयोगाशिवाय आरक्षण मिळत नाही'
    कॉंग्रेस-राष्ट्रवादीला चांगलं माहीत होतं - दानवे
    'राज्य सरकार हे झोपेत असल्यानंच ही परिस्थिती'
    'मराठा, OBC आरक्षण जाण्याला हे सरकार जबाबदार'
    मविआ सरकारमध्ये समन्वयाचा अभाव - दानवे

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स