liveLIVE NOW

LIVE Updates: ज्येष्ठ साहित्यिक प्रा.द. मा. मिरासदार यांचं निधन

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 02, 2021, 19:32 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:20 (IST)

  'वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुढे ढकललं'
  'रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत होऊ नये म्हणून निर्णय'
  'आजच्या चर्चेत रेग्युलराझेशनसाठी ठाम आश्वासन'
  'येत्या 2 मंत्रिमंडळ बैठकींमध्ये प्रस्ताव घेण्यात येईल'
  'कामबंद आंदोलन 15 दिवसांसाठी पुढे ढकललं'
  वैद्यकीय महाविद्यालय अधिकारी संघटनेची माहिती

  20:15 (IST)

  'विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीनं मोठं नुकसान'
  सर्वाधिक झळ मराठवाड्याला - देवेंद्र फडणवीस
  'नुकसानीकडे कुणी बघत नाही, पंचनामे नाहीत'
  'शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय'
  नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत - देवेंद्र फडणवीस
  'शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवणार'
  'केंद्र मदत करतंच मात्र राज्यानंही दिलासा द्यावा'
  'राज्य सरकारनं तातडीनं मदत घोषित करावी'
  मराठवाडा दौऱ्यात देवेंद्र फडणवीसांची मागणी

  19:50 (IST)

  पुणे - ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द.मा. मिरासदार यांचं राहत्या घरी 94 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन; ग्रामीण कथाकथनकार अशी द.मा. मिरासदारांची खास ओळख 

  19:16 (IST)

  ज्येष्ठ साहित्यिक प्रा.द.मा. मिरासदार यांचं निधन
  मिरासदारांचं पुण्यात राहत्या घरी वार्धक्यानं निधन
  ग्रामीण कथाकार अशी मिरासदारांची खास ओळख 

  14:51 (IST)

  'कोस्टल रोडमध्ये एक हजार कोटींचा भ्रष्टाचार'
  भाजप आमदार आशिष शेलारांचा गंभीर आरोप
  सत्ताधारी शिवसेनेची मिलीभगत - आशिष शेलार
  शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी 

  13:26 (IST)

  'मनपा निवडणुकांसाठी दोनचा प्रभाग करावा'
  ही माझी वैयक्तिक भूमिका - पृथ्वीराज चव्हाण
  'एकचा प्रभाग करण्याला मी विरोध केला होता'
  '2 किंवा 4 च्या प्रभागाची मागणी केली होती'
  तडजोड म्हणून तीनचा प्रभाग - पृथ्वीराज चव्हाण

  13:15 (IST)

  नगर - गडकरींच्या हस्ते महामार्गाचं भूमिपूजन
  नगर जिल्ह्यातील अनेक कामांचं लोकार्पण
  'वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन महत्वाचं'
  देशाच्या प्रगतीसाठी 4 गोष्टी महत्वाच्या - गडकरी
  रस्ते चांगले म्हणून अमेरिका श्रीमंत - गडकरी
  उद्योगांसाठी रस्त्यांचं जाळं हवं - गडकरी
  'देशातील गरिबी दूर करण्यासाठी रोजगार हवा'
  'राज्य सरकार जागा देईल तिथं गुंतवणूक करू'
  गायीचा गर्भ ट्रान्सप्लांट करता येणार - गडकरी
  दुग्धोत्पादन वाढीसाठी संशोधन गरजेचं - गडकरी
  'दिल्लीत असलो तरी महाराष्ट्राचा प्रतिनिधी'
  'देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचा व्हावा ही इच्छा'
  'गाड्यांमध्ये 100 टक्के इथेनॉल वापरलं पाहिजे'
  'साखर कारखान्यांनी इथेनॉल पंप सुरू करावेत'
  'कोणत्याही धान्यापासून इथेनॉल उत्पादनास परवानगी'
  इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त - नितीन गडकरी
  'कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याचं काम करणार'
  जामखेड-बीड मार्गाचं काम सुरू होणार - गडकरी

  11:3 (IST)

  पुणे - रेड्याच्या मालकावर गुन्हा दाखल
  रेड्याची एका व्यक्तीला जोरदार धडक
  'त्या' रेड्याची उत्तम नगर परिसरात दहशत

  11:2 (IST)

  नागपूर - 12 वर्षांच्या मुलीचा सौदा
  मुलीच्या कौमार्याचा 40 हजारांमध्ये सौदा
  गुन्हे शाखेकडून 3 महिला दलालांना अटक
  पोलिसांकडून पीडित मुलीची सुटका

  10:41 (IST)

  मुंबई-गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा
  गडकरी, शरद पवार, सुनील तटकरेंच्यात चर्चा
  पुणे विमानतळावर तिघांमध्ये झाली चर्चा
  रखडलेल्या कामाबाबत 5 तारखेला दिल्लीत बैठक
  राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची माहिती
  बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स