liveLIVE NOW

LIVE : सांगलीत ऑक्सिजन प्लाँटला गळती; दुरूस्तीचं काम सुरू

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 02, 2021, 22:19 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  22:16 (IST)

  सांगलीत ऑक्सिजन प्लँटला गळती
  मिरज शासकीय कोविड हॉस्पिटलमधील घटना
  6 केएल क्षमतेचा आहे ऑक्सिजन प्लँट
  लिकेज काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू
  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
  दुसरा प्लँट असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम नाही

  22:8 (IST)

  मुंबईत उद्या लसीकरण बंद राहणार - महापालिका
  'लसीचा साठा उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद'

  19:37 (IST)

  राज्यात दिवसभरात 29,270 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 15,169 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 285 रुग्णांचा मृत्यू
  रिकव्हरी रेट 94.54 तर मृत्युदर 1.67 टक्के
  राज्यात सध्या 2 लाख 16,016 अॅक्टिव्ह रुग्ण

  19:9 (IST)

  ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला - प्रवीण दरेकर
  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची मुंबई मनपावर टीका
  महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा - प्रवीण दरेकर
  घोषणासम्राट सरकारचं नियोजन फसलं - दरेकर
  परवानगी देऊनही लस खरेदी नाही - प्रवीण दरेकर

  18:20 (IST)

  नाशिक - महापालिका आयुक्तांच्या दणक्यानंतर डॉक्टर असोसिएशनचं घूमजाव, मनपा आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय मागे, सेवा पूर्ववत न केल्यास कारवाईचा आयुक्तांचा इशारा, डॉक्टर संघटनेनं पत्र मागे घेत सेवा पूर्ववत देण्याची दिली ग्वाही, डॉक्टरांनी केलेल्या तक्रारींवरही योग्य ती कारवाईचं मनपा आयुक्तांचं आश्वासन

  18:14 (IST)

  परदेशी लस भारतात येण्याचा मार्ग मोकळा - सूत्र
  मॉडर्ना, फायझरच्या अटी मान्य करण्यास केंद्र तयार?

  18:11 (IST)

  ठाणे - हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
  दोन हायप्रोफाईल अभिनेत्रींना अटक
  ठाणे क्राईम ब्रँचची मोठी कारवाई 
  खासगी सोसायटीत सुरू होतं सेक्स रॅकेट
  तीन एजंटसह दोन अभिनेत्रींना अटक

  17:24 (IST)

  12वीच्या परीक्षेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
  'परीक्षा नको असं मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांचं मत'
  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
  'आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्रस्ताव जाणार'
  प्रस्तावानंतर अंतिम निर्णय घेणार - शिक्षणमंत्री
  12वी परीक्षेवर 2 दिवसांत निर्णय - वर्षा गायकवाड

  17:15 (IST)

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
  'कोरोनाच्या लाटेत काही बालकं अनाथ झाली'
  'त्या अनाथ बालकांचं पालकत्व शासन घेणार'
  'दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य'
  बँक खात्यात 5 लाख जमा करणार - यशोमती ठाकूर
  'एक पालक गमावलेल्या बालकांनाही केलंय अंतर्भूत'
  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
  'उद्योग निरीक्षक (गट-क) संवर्गाची नामनिर्देशाची पदं'
  'लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट होणार'
  स्थलांतरित ऊसतोड मजुरांसाठी मोठी बातमी
  'ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह योजना'
  वसतिगृह सुरू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
  यावर्षी 20 वसतिगृहं बांधणार - धनंजय मुंडे
  '10 मुलांसाठी, 10 मुलींसाठी वसतिगृहं असणार'

  16:49 (IST)

  मुंबई उपनगर जिल्ह्यात 3118 मृतांच्या कुटुंबीयांचं सर्वेक्षण, कोरोनामुळे 444 बालकांनी गमावलेत पालक, कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं संरक्षण व न्यायहक्क मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कृतिदल सक्रिय

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स