ग्लोबल वॉर्मिंग हा चिंतेचा विषय - नरेंद्र मोदी
भारतासाठी ग्लोबल वॉर्मिंग एक आव्हान - मोदी
भारत आपलं कर्तव्य चोखपणे बजावतंय - मोदी
'पॅरिस परिषद ही माझ्यासाठी भावनिक विषय'
22:2 (IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची ईडीकडून चौकशी
अनिल देशमुखांची ईडीकडून मॅरेथॉन चौकशी
ईडीकडून देशमुखांचा जबाब नोंदवण्याची कार्यवाही
अनिल देशमुखांची 10 तासांनंतरही चौकशी सुरूच
देशमुखांवर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप
वरिष्ठ अधिकारी सत्यव्रत कुमारही ईडी कार्यालयात
चौकशीनंतर अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?
'कोर्टाचा आदर म्हणून मी ईडी कार्यालयात आलो'
ईडी चौकशीत संपूर्ण सहकार्य करणार - देशमुख
'परमबीर सिंगांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे'
परमबीर आहेत कुठे? अनिल देशमुखांचा सवाल
21:27 (IST)
एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं - अनिल परब
दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा - परब
'जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका'
परिवहनमंत्र्यांचं संपावर गेलेल्या कामगारांना आवाहन
20:22 (IST)
पुणे - दिवाळीच्या तोंडावर कोरोनाची गुड न्यूज
प्रथमच कोरोना रुग्णवाढीची संख्या 50च्या खाली
पुण्यात दिवसभरात कोरोनाचा एकही बळी नाही
19:46 (IST)
मलिकांचे आरोप, अमृता फडणवीसांचं उत्तर
मी राजकारणी नाही, समाजसेविका - अमृता
रिव्हर मार्च संस्थेनं संपर्क साधला - अमृता
मी त्यांना नद्यांबाबत माहिती दिली - अमृता
'स्वत: नद्यांची पाहणी केल्यावर मला रडू आलं'
मुंबईतील नद्यांची दुरवस्था - अमृता फडणवीस
'मी स्वत: रिव्हर मार्चच्या माध्यमातून फिरत होती'
'मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी पाठिंबा दिला'
चळवळीसाठी पैसे न घेता गाणं बनवलं - अमृता
'नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर अँथम गायलं'
'माझ्या अंगावर येणाऱ्यांना मी सोडणार नाही'
माझ्याआडून देवेंद्रना टार्गेट करू नका - अमृता
सरळ रस्त्यानं जाणाऱ्यांना डिवचू नका - अमृता
जाणीवपूर्वक आरोप होतायत - अमृता फडणवीस
18:38 (IST)
नाशिक - लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकरांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला
18:16 (IST)
पंढरपूर - अकलूजच्या उघडेवाडी गावातील घटना
अल्पवयीन मुलीवर 3 नराधमांकडून लैंगिक अत्याचार
वेळापूर पोलिसात गुन्हा, तिघांनाही केली अटक
तीनही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
18:1 (IST)
उल्हासनगर - अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, कॅम्प नं.3 च्या शांतीनगर भागात इंटरप्रायझेसवर धाड, बर्फी बनवण्यासाठी लागणारं 900 किलोचं साहित्य जप्त, कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले
17:30 (IST)
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंगांना डिस्चार्ज
डॉ.मनमोहन सिंग एम्स रुग्णालयातून घरी परतले
16:54 (IST)
नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाली बांधकामात जुन्या भंगार लोखंडाचा सर्रास वापर, नागपूर जिल्ह्यातील मांढळ येथील घटना, मांढळ गावच्या रहिवाशांच्या जागृतीमुळे पुढे आला प्रकार, दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची नागरिकांची मागणी
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स