LIVE : नागपूरमध्ये 18 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणाला सुरुवात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 01, 2021, 15:14 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:11 (IST)

  पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशातून येणाऱ्यांसाठी चाचणी अनिवार्य, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी काढले आदेश

  21:22 (IST)

  मीरा-भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीतील 3 कोविड सेंटरमधील 300 अतिरिक्त बेड‌्सच्या सुविधेचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद‌्घाटन, मीरा-भाईंदर पालिकेला ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडवून ऑक्सिजन बेड‌्स वाढवण्याची सूचना

  20:27 (IST)

  सर्व पालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंच पाहिजे, लहानांमधील वाढत्या संसर्गाच्या दृष्टीनं रुग्णालयातील नियोजन करून ठेवा, घरी विलगीकरणातील रुग्णांना वेळीच रुग्णालयांत हलविण्यासंदर्भात ज्येष्ठ डॉक्टर्सचा नियंत्रण कक्ष उभारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुंबई, पुणे क्षेत्रातील पालिका आयुक्तांना महत्वपूर्ण सूचना

  20:26 (IST)

  मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
  मुंबईत दिवसभरात 3908 नवीन रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 5900 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात 90 रुग्णांचा मृत्यू
  मुंबईत सध्या 59,318 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:25 (IST)

  राज्यात दिवसभरात 63,282 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात 61,326 कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 802 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 84.24, मृत्युदर 1.49%
  राज्यात सध्या 6 लाख 63,758 ॲक्टिव्ह रुग्ण

  19:58 (IST)

  नाशिक जिल्ह्याला कोरोनाचा काहीसा दिलासा
  नवीन बाधित रुग्णसंख्या झाली कमी
  रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 3412 नवे रुग्ण
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 6104 कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 38 रुग्णांचा मृत्यू

  19:40 (IST)

  राज्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ, 26 जिल्ह्यांमध्ये संध्या. 6 पर्यंत 11,492 लाभार्थ्यांना लस

  19:37 (IST)

  नाशिक जिल्ह्यात लससाठा झाला शून्य
  नाशिकमधील सर्व लसीकरण केंद्र झाली बंद
  अडीच लाखांच्या डोसची केली आहे मागणी
  अजून 2 दिवस तरी पुरवठा होण्याची चिन्हं नाहीत
  जि.प., सिव्हिल यंत्रणा, महापालिकेचा साठा संपला

  18:55 (IST)

  ठाणे - पार्किंग प्लाझा कोविड केंद्रातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ, 300 ऑक्सिजन बेड्स वाढवणं शक्य होणार असल्यानं कोविड सेंटर होणार स्वयंपूर्ण

  17:56 (IST)

  अमरावती - RFO दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीची अमरावती कारागृहात रवानगी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स