CBSE पाठोपाठ ICSE बारावीच्या परीक्षा रद्द
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
21:19 (IST)
CBSE बोर्डाच्या बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद
20:40 (IST)
पुण्यात दिवसभरात 384 नवीन रुग्णांची नोंद
पुण्यात दिवसभरात 858 कोरोनामुक्त
पुण्यात दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात 835 नवीन रुग्णांची नोंद
मुंबईत दिवसभरात 5868 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू
20:24 (IST)
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मविआ नेत्यांची झाली बैठक
'ओबीसी समाजाची संपूर्ण माहिती गोळा करणार'
'स्वतंत्र मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणार'
राज्य सरकारच्या बैठकीत निर्णय - विजय वडेट्टीवार
20:18 (IST)
CBSEची 12वी परीक्षा रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांकडून निर्णयाचं स्वागत
विद्यार्थ्यांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता - गायकवाड
'राज्यातील 12वी परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेऊ'
20:14 (IST)
कोविड उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या फॅवीपिरावीर आणि हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन औषधांचा बनावट साठा अन्न आणि औषध प्रशासनानं केला जप्त
19:57 (IST)
खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केलेत - राजेश टोपे
'प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यायला नको'
नवीन अधिकारी डॉक्टर सेवेत आले पाहिजेत - टोपे
'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत निर्णय घेतला'
एक वर्षात या सेवा खंडित करणार आहोत - टोपे
19:32 (IST)
CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द
नरेंद्र मोदींच्या बैठकीत मोठा निर्णय
विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची - पंतप्रधान
19:26 (IST)
राज्यासाठी सकारात्मक, दिलासादायक बातमी
राज्यात दिवसभरात 35,949 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 14,123 नवीन रुग्ण
राज्यात दिवसभरात 477 रुग्णांचा मृत्यू
राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.28 टक्के
राज्यात सध्या 2 लाख 30,681 अॅक्टिव्ह रुग्ण
19:19 (IST)
'विरोधक तारीख पे तारीख देत आहेत, देऊ द्या'
मविआ सरकार 5 वर्षं टिकणार - नवाब मलिक
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स