LIVE: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागात NDRFच्या 15 टीम तैनात

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | June 09, 2021, 21:06 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    21:34 (IST)

    चंद्रपूर - 'वाघाच्या मृत्यूची योग्य चौकशी करा'
    स्थानिक वन्यजीवप्रेमींची वनविभागाकडे मागणी
    राजुरा तालुक्याच्या विहीरगाव जंगल परिसरातील घटना

    21:29 (IST)

    जळगावच्या एरंडोल तालुक्यातील तळईची घटना
    शेतातून घरी जाताना अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू

    21:24 (IST)

    एनडीआरएफच्या 15 टीम महाराष्ट्रात तैनात
    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम
    समुद्रकिनारपट्टी असलेल्या जिल्ह्यांमध्ये तैनात
    इशाऱ्यानंतर राज्य सरकारची पूर्वतयारी
    गरज भासल्यास NDRFची तात्काळ मदत घेता येईल

    20:45 (IST)

    पश्चिम रेल्वे सुरळीत, मध्य रेल्वे पुन्हा ट्रॅकवर
    हार्बर रेल्वे मात्र पाणी ओसरण्याच्या प्रतीक्षेत

    19:45 (IST)

    सायन आणि माटुंगा ब्रीज वाहतुकीसाठी बंद
    वडाळ्याच्या चार रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं
    वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रॅफिक जाम

    19:4 (IST)

    मान्सून 15 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार
    मान्सूनची व्हाया महाराष्ट्र, उत्तर भारताकडे वाटचाल
    3 दिवसांत मान्सून उत्तर प्रदेशात धडक देणार

    18:51 (IST)

    मुंबईला जोरदार पावसानं दिवसभर झोडपलं
    12 तासांत तब्बल 200 मिमी पावसाची नोंद
    पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं
    आता 2 तासांपासून मुंबईत पावसाची विश्रांती
    साचलेलं पाणी ओसरतंय, परिस्थिती पूर्वपदावर
    हार्बर लाईन आणि मध्य रेल्वे मार्ग बंद
    अजून अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी
    पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सुरळीत

    18:11 (IST)

    मुंबईतील चेंबूरचं टिळकनगर पाण्याखाली
    अनेक इमारतींमध्ये पाणी घुसलं, रस्त्यावर 2-3 फूट पाणी

    18:9 (IST)

    केंद्र सरकारनं लागू केलेला आदर्श भाडेकरू कायदा महाराष्ट्रात लागू करू नये यासाठी शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांनी शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाईंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन पत्र दिलं

    17:37 (IST)

    मुंबई महापौर, मनपा आयुक्तांकडून हिंदमाता इथं संयुक्त पाहणी, पाण्याचा निचरा वेगानं करण्याच्या उपाययोजनेची प्रत्यक्ष पाहणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स