महाराष्ट्रातील कोरोनाचं दिलासादायक चित्र; रुग्ण जास्त मात्र मृत्यूदर कमी

महाराष्ट्रातील कोरोनाचं दिलासादायक चित्र; रुग्ण जास्त मात्र मृत्यूदर कमी

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोनाची कमी प्रकरणं असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील (maharashtra) मृत्यूदर (death rate) कमी आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना (coronavirus) रुग्णांचा आकडा पाहिला की धडकीच भरते. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पार झाली आहे. मात्र तरीही दिलासा म्हणजे राज्यातील मृत्यूदर मात्र कमी आहे. राज्यातील मृत्यूदर 3.25 टक्के आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोनाची कमी प्रकरणं असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी आहे.

महाराष्ट्रात रविवारी कोरोनाव्हायरसची नवीन 3041 प्रकरणं दिसून आली. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 50231 वर पोहोचला. तर 1635  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात महाराष्ट्रापेक्षाही कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी आहेत, त्या राज्यातील मृत्यूदर मात्र महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.

हे वाचा - भारताने करुन दाखवलं! सर्वाधिक पीपीई किट बनवणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर

राज्यातील रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 33 टक्के आहे. आतापर्यंत 13404 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

इतर आजार असलेल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचं विश्लेषण करता, या रुग्णांना आधीपासूनच कोणता कोणता आजार होता. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्येही 71 टक्के म्हणजे.1120 कोरोना रुग्ण इतर आजाराने ग्रस्त होते. तर फक्त 29% म्हणजे 468 रुग्ण असे होते ज्यांना इतर आजार नव्हता. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

महिलांपेक्षा सर्वाधिक पुरुष कोरोनाचे शिकार

पुरुषांनी अधिक खबरदार राहण्याची गरज आहे. कारण राज्यात 62% पुरुष कोरोनाग्रस्त आहेत. तर महिलांमध्ये हे प्रमाण 38% आहे. मृत्यूमध्येही सर्वाधिक प्रमाण पुरुषांचं आहे. कोरोनामुळे 63% पुरुषांचा तर 37% महिलांचा मृत्यू झाला आहे.

तरुण कोरोना रुग्णांची संख्या जास्त

कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा वयस्कर माणसांना आहे, असं सुरुवातीला म्हटलं जात होतं. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसची लागण झालेले सर्वाधिक रुग्ण तरुण आहेत. फक्त 21 ते 30 वयोगटातीलच सर्वात जास्त म्हणजे तब्बल 9798 रुग्ण आहेत. त्या तुलनेत 61 वयापेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता तरुणांनीही अधिक काळदी घेण्याची गरज आहे.

संपादन - प्रिया लाड

हे वाचा - पुणे शहरातून चिंताजनक आकडेवारी, कोरोना रुग्णांनी पार केला 5 हजारांचा आकडा

First published: May 25, 2020, 6:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading