कोरोनचा कहर सुरूच, ही आहे आजची राज्याची आकडेवारी

कोरोनचा कहर सुरूच, ही आहे आजची राज्याची आकडेवारी

राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून आजही रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जून : राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून आजही रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आज कोरोनाच्या 3870 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 60 हजार 147 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज 1591 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 65 हजार 744 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865 नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 6 लाख 66 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 26 हजार 278 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात 170 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 69 मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. दरम्यान, भारतातील आजच्या आकडेवारीनुसार, देशात  गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 15413 रुग्ण आढळून आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4,10,461 वर पोहोचली आहे. तर  अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,69,451 इतकी आहे.

गेल्या 24 तासामध्ये 15,413 रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंतही ही सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याचं समोर आले आहे. तर देशभरात 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासातील असून चिंताजनक आहे. तर देशभरात आतापर्यंत  एकूण 13254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

संपादन- रेणुका धायबर

First published: June 21, 2020, 11:18 PM IST

ताज्या बातम्या