Home /News /maharashtra /

Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच, अनेक जिल्ह्यांमध्ये बाधितांचा आकडा प्रचंड वाढला

Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरुच, अनेक जिल्ह्यांमध्ये बाधितांचा आकडा प्रचंड वाढला

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाने थैमान घातला आहे. यवतमाळ, रत्नागिरी, जळगाव, जालना, बीड, अकोला, वर्धा, वाशिम अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai Corona) नव्या कोरोनाबाधितांची संख्या थोडी घटली असली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोना संसर्गचा वेग प्रचंड वाढताना दिसतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाने थैमान (Maharashtra Corona) घातला आहे. यवतमाळ (Yavatmal), रत्नागिरी (Ratnagiri), जळगाव (Jalgaon), जालना (Jalna), बीड (Beed), अकोला (Akola), वर्धा (Wardha), वाशिम (Washim) अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची नवी आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. पुणे जिल्ह्यात (Pune Corona) तर कोरोनाबाधितांचा आकडा दररोज 10 हजारांच्या पुढेच असते. त्यामुळे या कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण कसं मिळवावं? हे आरोग्य यंत्रणेपुढे मोठं आव्हान आहे. यवतमाळमध्ये कोरोनाचा उद्रेक यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. यवतमाळमध्ये आज दिवसभरात तब्बल 309 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बाधितांची ही आकडेवारी जिल्हा प्रशासनासाठी चिंता वाढवणारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 1544 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 75 हजार 285 रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत कोरोना वाढतोय रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 222 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनामुळे तीन रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 1 हजार 313 वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 82 हजार 601 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आजपर्यंत 2 हजार 501 जणांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. (वय वर्षे 35, दिसतोही धडधाकट; तरी हा लहान मुलांसारखं दररोज घालतो डायपर कारण...) जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा प्रचंड उद्रेक सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 428 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात तरीही 3127 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 547 रुग्ण आढळले आहेत. तर 1 लाख 41 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 2552 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातही कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसतोय. जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 363 नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी जालना शहरात सर्वाधित 257 रुग्ण आढळले आहेत. जालना जिल्ह्यात पाच दिवसांत तब्बल 1254 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या 1546 रुग्ण सक्रिय आहेत. जालना जिल्ह्यातील गेल्या पाच दिवसातील रुग्णांची आकडेवारी 18 जानेवारी - 99 19 जानेवारी - 282 20 जानेवारी - 224 21 जानेवारी - 284 22 जानेवारी - 365 अकोला जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट अकोला जिल्ह्यातही दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 434 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 979 रुग्ण आढळले आहेत. तर 1148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 2472 सक्रिय रुग्ण आहेत. (शहरात दहशत असणाऱ्या 'लेडी डॉन'च्या प्रेमात 2 गँगस्टर झाले 'जानी दुश्मन') अकोला जिल्ह्यातील गेल्या पाच दिवसातील रुग्णांची आकडेवारी 17 जानेवारी - 123 18 जानेवारी - 367 19 जानेवारी - 398 20 जानेवारी - 469 21 जानेवारी - 397 22 जानेवारी - 434 वर्धा जिल्ह्यात दिवसभरात 575 नवे रुग्ण वर्धा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं थैमान सुरु आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 575 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 हजार 444 वर पोहोचली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत असला तरी सर्वसामान्य नागरीक कोरोना नियमांचा विसर पडल्यासारखं वागताना दिसत आहेत. बाजारपेठेत, शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ आयसोलेशन वार्ड सुरू करण्यात आला. मात्र आरोग्य यंत्रणा आयसीयू, कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आले नाही. 15 जानेवारी - 215 16 जानेवारी - 184 17 जानेवारी - 45 18 जानेवारी - 368 19 जानेवारी - 414 20 जानेवारी - 420 21 जानेवारी - 501 वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णवाढ वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात 192 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 69 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 42892 रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात सध्या 789 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 639 जणांचा मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, 611 नवे कोरोनाबाधित अमरावती जिल्ह्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णांचा विस्फोट झाला आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 611 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 2828 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या