Breaking : राज्यात सापडले आणखी 26 कोरोना रुग्ण, एकूण आकडा 661 वर

Breaking : राज्यात सापडले आणखी 26 कोरोना रुग्ण, एकूण आकडा 661 वर

कोरोना विषाणू भारतात येताच तात्काळ प्रशासकीय यंत्रणेने फैलाव रोखण्यासाठी उत्तम प्रयत्न केले. पण असं असतानाही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणं ही चिंतेची बाब आहे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांचा सतत वाढणारा आकडा आता 661वर गेला आहे. राज्यात आज एकूण 26 नवे रुग्ण आढळले आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर कोरोना विषाणू भारतात येताच तात्काळ प्रशासकीय यंत्रणेने फैलाव रोखण्यासाठी उत्तम प्रयत्न केले. पण असं असतानाही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणं ही चिंतेची बाब आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिका 17, पिंपरी-चिंचवडच्या 4, नगरमध्ये 3, औरंगाबाद 2 अशी 26 जणांची आज एकूण वाढ झाली आहे. कोरोनाच्या आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे लोकांना घरीच राहण्याचे आवहन करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी

मुंबई – 377

पुणे (शहर व ग्रामीण भाग)– 103

मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे 77

सांगली – 25

अहमदनगर – 20

नागपूर – 17

लातूर - 8

बुलढाणा- 5

औरंगाबाद – 5

यवतमाळ – 4

सातारा – 3

उस्मानाबाद -3

कोल्हापूर – 2

रत्नागिरी – 2

जळगाव- 2

वाशिम-1

सिंधुदुर्ग – 1

गोंदिया – 1

नाशिक – 1

अमरावती -1

हिंगोली -1

इतर राज्य (गुजरात) – 01

First published: April 5, 2020, 12:02 PM IST

ताज्या बातम्या