विधानसभेच्या तयारीसाठी यात्रांचा सुकाळ, आता काँग्रेसचंही वरातीमागून घोडं

विधानसभेच्या तयारीसाठी यात्रांचा सुकाळ, आता काँग्रेसचंही वरातीमागून घोडं

खिळखिळी झालेली संघटना, सत्तेत नसल्याने आटलेले आर्थिक स्रोत, नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत मतभेद यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झालीय.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 22 जुलै : राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी आता फक्त काही महिने राहिले आहेत. महिनाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. भाजप आणि शिवसेना यात आघाडीवर आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पराभवाच्या धक्क्यातून सावरत पक्षाला पुन्हा नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न करताहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या यात्रेवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यव्यापी महाजनादेश यात्रेची घोषणा केलीय. त्यानंतर आता काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा आज करण्यात आलीय.

पार्थ पवारांची पुन्हा स्टंटबाजी? कचरा नसलेल्या ठिकाणी स्वच्छता अभियान

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेला उत्तर महाराष्ट्रातल्या पाचोरा इथून सुरुवात केलीय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातल्या गुरुकुंज मोझरी इथून महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरुवात करणार आहेत. अशी घोषणा रविवारी भाजपच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात करण्यात आली.

त्यापाठोपाठ आता काँग्रेसनेही संपर्क यात्रेची घोषणा केलीय. प्रदेशाध्यक्ष आणि सर्व कार्यकारी अध्यक्ष हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. ऑगस्टमध्ये ही यात्रा निघणार असून पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सभा, मेळावे, बैठका घेऊन थोरात हे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम करणार आहेत.

'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा

आगामी विधानसभा काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाते. कारण या निवडणुकीत काँग्रेसला विजयाचा सूर गवसला नाही तर मात्र काँग्रेसची राज्यातली स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. खिळखिळी झालेली संघटना, सत्तेत नसल्याने आटलेले आर्थिक स्रोत, नेतृत्वाचा अभाव, पक्षांतर्गत मतभेद  यामुळे पक्षाची अवस्था बिकट झालीय. त्यातच गेली पाच वर्ष काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लगालं. लोकसभेतही दारुण पराभव झाला. त्यामुळे आत्मविश्वास ढासळला असून पक्षात नवीन प्राण फुंकण्यासाठी बाळासाहेब थोरातांना अथक परिश्रम घ्यावे लागणार आहे.

पुण्यातील इंजिनिअर होणार काँग्रेसचा अध्यक्ष? अर्ज करणार असल्याने चर्चेचा विषय

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी केलीय. त्यापाठोपाठ काँग्रेसची ही यात्रा निघत असल्याने काँग्रेसचं वरातीमागून घोडं ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त केलीय जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading