महाराष्ट्राची बदनामी करणारे केंद्र सरकारमधील 'हे' मंत्री काय कामाचे? काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्राची बदनामी करणारे केंद्र सरकारमधील 'हे' मंत्री काय कामाचे? काँग्रेसचा सवाल

Maharashtra Congress on Central Government ministers: महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. यावरुन आता काँग्रेसने केंद्र सरकारमधील मंत्र्यांवर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Coronavirus 2nd wave) महाराष्ट्रातील परिस्थिती खूपच भयावह झाल्याचं दिसत आहे. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत तर कुठे रेमडेसिवीर (Remdesivir) आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी (Medical Oxygen shortage) पडत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा महाराष्ट्राला केला तर परवाना रद्द करण्याची धमकी केंद्र सरकारने निर्यातदारांना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. यानंतर आता काँग्रेस (Congress)ने सुद्धा भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने ट्विट करत केली टीका

महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलं, ऑक्सिजन तुटवड्याच्या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत असं उत्तर देण्यात येतं. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे? असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विट सोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे आणि संयज धोत्रे या राज्यातील नेत्यांचे फोटो आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन पण....

राज्यातील आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण आणि अपुऱ्या पडत असलेल्या सुविधा पाहता ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान मोदींसोबत संपर्क होऊ शकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात असल्याने त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही.

नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतातील 16 निर्यातदारांकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकण्यास परवानगी मिळत नाहीये. केंद्र सरकार त्यांना नकार देत असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं. महाराष्ट्र सरकारने या 16 निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरसंदर्भात विचारणा केली असता केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास बंदी घातल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

First published: April 17, 2021, 4:55 PM IST

ताज्या बातम्या