मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ची रामाशी तुलना, वाद होण्याआधीच सारवासारव

नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या 'भारत जोडो'ची रामाशी तुलना, वाद होण्याआधीच सारवासारव

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Shreyas

बुलढाणा, 29 सप्टेंबर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केली आहे. श्रीरामाने ज्या प्रकारे वनवास भोगत पायी लंका गाठली त्याचप्रमाणे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा वनवासाप्रमाणे आहे, तेदेखील कन्याकुमारीपासून जम्मूपर्यंत यात्रा काढत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा वनवास सारखी आहे जसे श्रीराम यांनी वनवास केला होता त्याच प्रमाणे राहुल गांधी देखील आता भारत जोडण्यासाठी वनवास करीत आहेत, असं वक्तव्य नानांनी केलं. या वक्तव्यानंतर वाद होईल, अशी शक्यता निर्माण होताच नाना पटोले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मी श्रीराम यांच्याशी राहुल गांधी यांची तुलना केली नसून रामाचा वनवास ज्या प्रकारे होता त्यातून राहुल गांधी देखील भारत जोडण्यासाठी निघाले आहेत, असं आपण म्हणाल्याचं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं.

नोव्हेंबर महिन्यामध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तीन दिवसीय बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे.

First published:

Tags: Nana Patole, Rahul gandhi