मुंबईत काँग्रेसची तातडीने बैठक, ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना भेटून घेणार महत्त्वाचा निर्णय!

मुंबईत काँग्रेसची तातडीने बैठक, ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना भेटून घेणार महत्त्वाचा निर्णय!

राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली उपायोजना तसंच त्यात असलेल्या त्रुटी आणि करावयाचे बदल याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यताही आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये सध्याच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या या तातडीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. टिळक भवन इथे होणाऱ्या या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चर्चा करणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली उपायोजना तसंच त्यात असलेल्या त्रुटी आणि करावयाचे बदल याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यताही आहे. पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीमध्ये काही चांगल्या सूचना करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं आहे. तसंच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेदेखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज चर्चा करणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणि माणिकराव ठाकरे यांनी वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी समवेत वंचित बहुजन विकास आघाडीने यावं यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले आहे. याबाबत देखील काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड यांनी राज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. लाड हे विधान परिषदेचे आमदार असून  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे. राज ठाकरे हे गेल्या पाच वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करताहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं.

इतर बातम्या - VIDEO: डॉ. मनमोहन सिंग पुन्हा राज्यसभेत परतणार, सकाळच्या टॉप18 न्यूज

या भेटीवर प्रसाद लाड यांनी स्पष्टिकरण दिलं. ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलं. आपले आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. वारंवार आमच्या भेटी होत असतात. त्यात राजकारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर, सांगलीमध्ये पुन्हा सतर्कतेचा इशारा, 'या' तारखांना होणार मुसळधार पाऊस

महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्यात वेधशाळेनं पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातल्या घाट क्षेत्रामध्ये 13 आणि 14 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कुठे पाणी ओसरून पुरामुळे उद्ध्वस्त झालेला संसार सुरळीत सुरू करायचा आहे. त्यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

गेल्या 8 दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं. त्यात सोमवारी मात्र पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. पण आज आणि उद्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढणार आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. तर कोकणातल्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14ला तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

First Published: Aug 13, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading