मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ठाकरे सरकारच्या महिला मंत्र्यांना कोर्टाचा दणका! पोलिसावर हात उगारण्याबद्दल झाली 3 महिन्यांची शिक्षा

ठाकरे सरकारच्या महिला मंत्र्यांना कोर्टाचा दणका! पोलिसावर हात उगारण्याबद्दल झाली 3 महिन्यांची शिक्षा

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 8 वर्षांपूर्वीच्या अमरावतीच्या एका प्रकरणात 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 8 वर्षांपूर्वीच्या अमरावतीच्या एका प्रकरणात 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 8 वर्षांपूर्वीच्या अमरावतीच्या एका प्रकरणात 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

अमरावती, 15  ऑक्टोबर : काँग्रेसच्या (Maharashtra congress) आक्रमक नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना न्यायालयाने दणका दिला. आठ वर्षं जुन्या प्रकरणात त्यांना गुरुवारी दोषी ठरवण्यात आलं आणि जिल्हा सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना तीन महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. काय आहे प्रकरण? 24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. VIDEO: काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा हॉस्पिटलमध्ये राडा; पोलिसांवर भडकल्या पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती. ठाकूर यांची जामिनावर सुटकाही झाली आहे. यशोमती ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया 'न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल', असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या. भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.' गेल्या वर्षी मुंबईतल्या हॉस्पिटलमध्येही यशोमती पाटील यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याची बातमी समोर आली होती. आमदारांना भेटू का दिलं जात नाही, असं म्हणत त्यांनी रुग्णालयात राडा घातल्याचा VIDEO व्हायरल झाला होता.
Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: Congress, Yashomati thakur

पुढील बातम्या