मुंबई, 20 ऑक्टोबर: आजपासून राज्यातील कॉलेज (Colleges Reopen) पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) महामारीमुळे देशात राज्यात लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आला होता. त्यात शाळा (School College) कॉलेज बंद ठेवण्याचा घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे हळूहळू निर्बंध उठवण्यात येत आहे. अशातच राज्यातल्या शाळांपाठोपाठ कॉलेज आणि विद्यापीठे देखील सुरु होत आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक (corona vaccine) लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक केलं आहे.
कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार कडून काही नियमावली (Rules to attend College in Maharashtra) तयार करण्यात आली आहे.
असे असतील नियम
कॉलेज सुरु करताना कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.
50% पटसंख्या उपस्थितीत कॉलेज सुरू केले जाणार आहेत.
लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्याना कॉलजेमध्ये येणं शक्य होत नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी.
कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.
राज्यातील सर्व महाविद्यालयांनी कोरोनचे सर्व नियम पाळूनच महाविद्यालयं सुरु करायची आहेत.
दरम्यान मुंबई विद्यापीठाने (Mumbai university) आपल्या अंतर्गत येणारे महाविद्यालय सुरू करण्यासाठी परिपत्रक (Circular) जारी केलेत. विद्यापीठानं एसओपी जाहीर केलेत. महाविद्यालय खुले होणार पण वसतिगृह खुल्याकरण्या बाबतीत अजूनही संभ्रम कायम आहे.
मुंबई विद्यापीठाची SOP
50 टक्के आसन क्षमतेने स्थानिक प्राधिकारच्या आणि विद्यापिठाच्या सहमतीने वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांनाच परवानगी देण्यात येईल. महाविद्यालय सुरू करताना कोरोना प्रादुर्भाव रूग्ण संख्या याचा आढावा स्थानिक प्रशासन , महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संयुक्त विचारविनिमय करून घेता येईल.
हेही वाचा- पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणात घडणार मोठी घडामोड
कोरोना व्यवस्थापनाचे राज्य सरकारने आणि आयसीएम आर गाईडलाईन्सची अंमलबजावणी करत महाविद्यालय सॅनिटाइझ करणे स्वच्छता राखणे सुरक्षित अंतर मास्क या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
हेही वाचा- Commodity Market : शेअर बाजारातील कमोडिटी ट्रेडिंग काय आहे? गुंतवणुकीसाठी किती फायदेशीर?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra News