नाशिक, 24 जानेवारी: राज्यभरात थंडीचा (Temperature Drops) परिणाम दिसून येत आहे. नाशिक (Nashik) शहरात आज सकाळी 6.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीच्या कडाक्यानं नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. या हंगामातील सर्वांत निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीसोबत धुक्याची लाट पसरल्याचं चित्र आहे. निफाडचा पारा घसरून आला 5.5 अंशावर आला आहे तर मनमाडमध्ये 10, मालेगावात 9 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. थंडी आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. थंडीचा सर्वात जास्त फटका द्राक्षे बागांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
शनिवारी आणि रविवारी राज्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे राज्यभरातली तापमानात मोठी घसरण झाली. मुंबईतही अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतल्या तापमानातही मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. शहरातल्या अनेक भागात किमान तापमान 16 अंशांवर पोहोचलं. येत्या एक ते दोन दिवसांत मुंबईत थंडीचा प्रभाव असणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. मुंबईत 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मास्क घालून शिरला क्लिनिकमध्ये, अन् एकट्या बसलेल्या महिला डॉक्टरवर केला Attack
राज्यातल्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात पारा पुन्हा घसरला आहे. सपाटी भागात तापमान 07 ते 08 डिग्री सेल्सिअस पर्यत घसरले. आज सातपुडा पर्वत रागांमधील डाब भागात पुन्हा दवबिंदु गोठले आहेत. यामुळे गवतांवर बर्फाच्छादीत चादर पसरल्याचं चित्र दिसून आलं.
नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये 25 अंशाखाली कमाल तापमान नोंदवलं गेलं आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.