संजय राऊत म्हणाले, रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

संजय राऊत म्हणाले, रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील.

  • Share this:

अयोध्या,6 मार्च: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा..'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही तर...' मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी सांगितलं की, फैजाबाद एअर स्ट्रीपमध्ये लँडिंगसाठी अडचण असल्याने लखनौ एअरपोर्टवर उद्धव ठाकरे यांचं विमान लँडिंग करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शरयू नदीवर महाआरती करणार नाहीत. दरम्यान, शरयू नदीवर महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. परंतु, जास्त गर्दी होईल, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य आरोग्य विभागाने विनंती केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा.. ठाकरे सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर; अर्थसंकल्पानंतर फडणवीसांनी डागली तोफ

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने 100 दिवस पूर्ण केले आहेत. यासाठी उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करत आहे. ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही यावे, असं सांगत राम राज्याची कल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सगळ्यात आधी मांडली होती, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. राम मंदिर हे देशाचे अस्मिता मंदिर आहे. राम मंदिर कोणत्या एखाद्या पक्षाचं नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातून सुमारे 5 हजार शिवसैनिक अयोध्येत येत आहेत. अयोध्येत जास्त गर्दी होऊ नये, यासाठी शिवसैनिकांना न येण्याचेही आवाहन करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

First published: March 6, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading