• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवर काय म्हणाले मुख्यमंत्री, 'हे' आहेत भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवर काय म्हणाले मुख्यमंत्री, 'हे' आहेत भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Maharashtra (CM Udhav Thackeray) यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

 • Share this:
  मुंबई, 20 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Udhav Thackeray) यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईसह राज्यात नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता वाटतं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरही भाष्य केलं. सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. पण राजकीय हल्ले परतवत महाविकास आघाडी सरकानं एक वर्ष पूर्ण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा...मराठा आंदोलनात उभी फूट? राज्यव्यापी बैठकीवर मुंबई विभागाचा बहिष्कार मुख्यमंत्र्याच्या निवेदनातील महत्त्वाची मुद्दे... -प्रत्येक पावलावर सावध राहा, असं सांगण कुटुंबप्रमुख माझं कर्तव्य आहे. -कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आपल्याला यश आलं आहे. -केंद्राकडून पैसे येण्याचे बाकी असताना आपण आत्मविश्वासानं पुढं जात आहोत. -सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत, पण राजकीय हल्ले परतवत सरकारने एक वर्ष पूर्ण केलं. -नवीन वर्षाच स्वागत करताना सावध राहा. -सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन -नाइट कर्फ्यू आणि लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याची आवश्यकता वाटत नाही. -पुढील सहा महिने मास्क लावणं अनिवार्य आहे. -लस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत मास्क लावणं बंधनकार आहे. -सर्वानी कोरोना निर्बंधांचे पालन करत काळजी घ्यावी. -स्कायवॉक बनवताना दूरदृष्टी नसल्याने काही स्कायवॉक तोडावे लागत आहेत. -विकास सर्वगामी आणि दूरद्ष्टीचा असायला हवा. तात्कीलन विकासाला अर्थ नाही. -प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत प्रकल्पांना रोखणे कद्रूपणा आहे. -पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, आम्हीही जनतेचे सेवक आहोत. -कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फवारे मारणे योग्य नाही. -मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी होणारा वाद जनतेच्या हिताचा नाही -जनतेची जागा बिल्डरच्या घशात न घालता ती जनतेसाठीच वापरण्यात येत आहे. -पुढील 50, 100 वर्षांचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे. -कांजूरला 3, 4 आणि 6 या मेट्रोच्या तीन लाईन्ससाठी कारशेड करू शकतो. -पहिल्या मेट्रो प्रकल्पात स्टर्लिंग लाईनचा उल्लेख नव्हता -आपण आरेचे जंगल वाचवले आहे. संजय गांधी हे शहरात बनवलेले जंगल आहे. -मेट्रोसाठी कालांतराने आरेचे जंगल नष्ट झाले असते. -मी माझ्या मुंबईसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी अहंकारी आहे. -मेट्रो कांजूरमार्गबाबत सध्या वाद घालण्यात येत आहे. -विकास करताना अतिघाई टाळणे गरजेचे असते. -या सर्व गोष्टींमुळे प्रकल्पाचा खर्च वाढतो. नवीन गोष्टी येतात, त्या स्वीकाराव्या लागतात. -एखादा प्रकल्प सुरू केला की त्याला विरोध होतो, त्यात काही बदल करावे लागतात. -आधीचीच कामे पुढे नेत असल्याची टीका होते, मात्र कामाला स्थगिती द्यायची की पुढे न्यायची ते ठरवा -विकासकामे कुठेही थांबलेली नाहीत. -शाळा सुरू करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. -अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचे डागडूजी करत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. -राज्यातील गड, किल्ले, मंदिरे ही आपली संपत्ती आहे. -कोरोना महामारीच्या काळातही आपण अनेक सांमजस्य करार केले आहे. -आर्थिक चणचण असल्याचे मान्य करावे लागेल. -समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे. राज्याचा विकास झाला आहे. -या सर्व संकटाचा सामना करत सरकारने एक वर्ष पूर्ण केले आहे. -राजकीय हल्ले परतवत, आरोग्य संकटाशी मुकाबला करत राज्याचा विकास केला. -लग्नसमारंभात सहभागी होताना काळजी घ्या, मास्क काढू नका. -लग्नाचे आमंत्रण आप्तस्वकीयांना द्या, कोरोनाला देऊ नका. -नवीन वर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने सावध राहावे. -प्रत्येकाने कोरोनाबाबतचे निर्देश पाळण्याची गरज आहे. -राज्यात सध्या रात्रीच्या कफ्यूची गरज नाही. -आपण सुरक्षा आणि काळजी घेत हळूहळू गोष्टी सुरू करत आहोत. -लंडनमध्ये कोरोनाने आपले स्वरुप बदलले आहे. -लंडनमध्ये लॉकडाऊनचे कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. -जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. -कोरोनाची लस आल्यानंतरही आपल्याला मास्क घालणे आवश्यक आहे. -कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केल्यास आपण कोरोनाला रोखू शकतो. -उन्हाळा आणि पावसाळ्यात येणाऱ्या साथीचे आजार पसरण्यास आपण पायबंद घातला. -आता सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहे. -आपण सांगितलेल्या सूचनांचे जनतेने पालन केल्याने आता परिस्थिती नियंत्रणात आहे. -आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.
  Published by:Sandip Parolekar
  First published: