Home /News /maharashtra /

पंतप्रधान-मुख्यमंत्री 'फोन पे चर्चा'; ठाकरेंनी मोदींकडे केली अनैतिक राजकारणाविषयी ही तक्रार

पंतप्रधान-मुख्यमंत्री 'फोन पे चर्चा'; ठाकरेंनी मोदींकडे केली अनैतिक राजकारणाविषयी ही तक्रार

मोदी-उद्धव चर्चेत Coronavirus च्या राज्यातल्या परिस्थितीवर, उपाययोजनांबरोबरच राज्यातल्या राजकारणाविषयी बोलणी झाल्याचं समजतं.

मुंबई, 29 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींशी आज फोनवरून चर्चा केली. त्यामध्ये Coronavirus च्या राज्यातल्या परिस्थितीवर, उपाययोजनांवर चर्चा झालीच, पण त्याबरोबर ठाकरे यांनी राज्यातल्या अनैतिक राजकारणाविषयी मोदींकडे तक्रार केल्याचं समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधानांना सांगितलं. पंतप्रधान आणि ठाकरे यांच्यात COVID-19 च्या उपाययोजनांसदर्भात चर्चा झाल्याचं समजतं. परराज्यात अडकून पडलेल्या मजुरांच्या स्थालंतराच्या विषयावर देखील चर्चा झाली. पंतप्रधानांनी वेगवेगळ्या राज्यांची मुख्यमंत्र्यांशी कालच VIDEO conferencing द्वारे चर्चा केली. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंबरोबर वेगळी फोनवर चर्चाही झाली. वाचा - Make In Indiaच्या जोरावर चीनला टक्कर, भारतच स्वबळावर कोरोनाला हरवणार Coronavirus सारख्या संकटाच्या प्रसंगात देखील राज्यात अनैतिक राजकारण सुरू असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. या दोन नेत्यांच्या संभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मुद्दाही चर्चिला गेला. राज्यपालांना मुख्यमंत्रिपदाविषयीच्या पेचासंदर्भात कायदेशीर प्रस्ताव पाठवूनही त्यावर अंमलबजावणी होत नाही, याबाबत उद्धव यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विरोधकांच्या राजकीय धोरणांमुळे, महाराष्ट्रातील स्थिर सरकार अस्थिर करण्याचे अनैतिक प्रयत्नं सुरू आहेत. सध्याच्या वैश्विक रोगराईसारख्या प्रतिकूल परिस्थितीत, असंवेदनशील राजकारण सुरू आहे', अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं News18 lokmat चे प्रतिनिधी उदय जाधव यांनी सांगितलं. लॉकडाऊनची ठरलेली मुदत संपायला आता थोडाच कालावधी राहिला आहे. त्यासंबंधी पुढील घोषणा करण्याच्या दृष्टीनेही पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांची ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरली असण्याची शक्यता आहे. PHOTO - 'मकबूल'ला शेवटचा निरोप, लॉकडाऊनमुळे मोजका मित्रपरिवार उपस्थित आता काही राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत टाळेबंदी वाढवण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. पंजाबने सर्वप्रथम आणखी 15 दिवस टाळेबंदी वाढणार असल्याची घोषणा केली आता Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. अन्य बातम्या पुणेकरांना झालं तरी काय? कोरोना पीडितांच्या अंत्यसंस्कारास नागरिकांचा विरोध लॉकडाऊनमुळे गंगा इतकी स्वच्छ झाली की दिसले डॉल्फिन? वाचा VIRAL VIDEO मागचं सत्य

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:अरुंधती रानडे जोशी
First published:

Tags: BJP, Maharashtra politics

पुढील बातम्या