मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 05 जून : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी आयएएनएस आणि सी वोटर्सकडून संयुक्तरित्या एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता पाहण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात उद्धव ठाकरे हे पाचव्या स्थानावर आहेत. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे यश माझ्या एकट्याचं नसून त्यासाठी सगळ्यांनी काम केलं आहे. सहा महिन्याच्या कालावधीत हे शिवरायांचं राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्याचं यश आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यासंबंधी त्यांनी एक फेसबुक पोस्टदेखील शेअर केली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्त्वाचं. लोकप्रियतेचा माझा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हे माझं ध्येय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरंतर राज्यावर कोरोनाचं संकट आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. अशात विरोधी पक्षाचं आंदोलन, चक्रीवादळाचा सामना अशा अनेक संकटात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक मार्ग काढल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Uddhav thackeray

    पुढील बातम्या