मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठी बातमी, अडीच-अडीच वर्षांची चर्चा फडणवीसांच्या अनुपस्थितीतच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या वक्तव्याने शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती.

News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2019 03:22 PM IST

मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठी बातमी, अडीच-अडीच वर्षांची चर्चा फडणवीसांच्या अनुपस्थितीतच

विवेक कुलकर्णी, मुंबई, 29 ऑक्टोबर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झाला आहे. महायुतीची सत्ता स्थापन होईल असं म्हटलं जात असलं तरी सेना-भाजपमधल्या कुरबुरी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झालीच नव्हती असं म्हटल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे. सेना-भाजपमध्ये 50-50 फॉर्म्युल्याची चर्चा झाली मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारमध्ये अर्धा वाटा मिळावा यासाठी सध्या सेनेकडून ठाम भूमिका घेतली जात आहे. खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सेना भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला 50-50 चे आश्वासन दिले नव्हते असं म्हटलं होतं. सेनेकडून सातत्यानं आधी ठरलं तेच झालं पाहिजे अशी मागणी होत असताना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. यातच आता 50-50 फॉर्म्युल्याबाबतची चर्चा दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा झाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्री असा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यावेळी कोणताही निर्णय माझ्यासमोर झाला नव्हता. जर त्याबद्दल अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असेल तर त्यावर तेच निर्णय़ घेतील.

दुसरीकडे पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य करताना म्हटलं की, समान सत्ता वाटपाचा शब्द मुख्यमंत्र्यांनीच दिला. राऊत यांच्या वक्तव्याने युतीच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद समोर आला आहे.

वाचा : शरद पवारांच्या 'त्या' पाऊस भाषणावर मुख्यमंत्र्यांनी केली खोचक टीका!

एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेची चर्चा रंगली आहे. युतीचं सरकार येणार असलं तरी त्यातही सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार सरकार स्थापन होईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर म्हटलं होतं. तर लोकसभेत ठरल्याप्रमाणे युतीचा मार्ग निघाला नाही तर आम्ही वेगळ्या पर्यायांचा विचार करू असा इशारा आज संजय राऊत यांनी दिला.

वाचा : 'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

एकीकडे 50-50 चा फॉर्म्युला ठरला असल्याचं शिवसेनेनं म्हटलं तर असं काहीही बोलणं झालं नाही अशी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. सेना-भाजपच्या या गुंत्यामुळे खरंतर सत्ता कोण स्थापन करणार? आणि कोणाचा मुख्यमंत्री असणार यावर आता नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तर दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या विरोधात ठाकणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

वाचा : युतीच्या फॉर्म्युल्यावरून शिवसेनेची आक्रमक भूमिका, निवडणार दुसरा पर्याय?

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...