Home /News /maharashtra /

'...हा तर संविधानाचा अपमान', मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवर अमोल मिटकरींची टीका

'...हा तर संविधानाचा अपमान', मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवर अमोल मिटकरींची टीका

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश केला आणि पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश करण्याआधी एकनाथ शिंदे यांनी पूजा केली, पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या पूजेवर आक्षेप घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या गुरूवारी या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडला, यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच त्यांच्या शासकीय कार्यालयात आले. मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारण्याआधी त्यांनी पूजा केली आणि मगच कार्यालयात प्रवेश केला. पण आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या पुजेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आक्षेप घेतला आहे. 'एकनाथ शिंदे धार्मिक आहेत, याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण महाराष्ट्राचं शासकीय कामकाज भारतीय संविधानावर चालतं. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पूजा आणि विधीचे अधिकार आपल्या घरातच असावेत. सेक्युलर राष्ट्रामध्ये पूजा केली जात असेल, तर हे निंदनीय आहे. शासकीय कार्यालयात धार्मिक विधी होता कामा नये, हा संविधानाचा अपमान आहे,' असं अमोल मिटकरी म्हणाले. दरम्यान शिंदे गटातल्या आमदारांची बाजू पहिल्या दिवसापासून मांडणाऱ्या दीपक केसरकर यांनीही यावर भूमिका मांडली आहे. ज्या क्षणी शपथ घेतली त्याच दिवसापासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. पण भारतीय परंपरेप्रमाणे त्यांनी पुजा करून कार्यालयात प्रवेश केला आहे, असं केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयात आले तेव्हा त्यांचं कुटुंबियही त्यांच्यासोबत होतं. एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू सुद्धा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही लावण्यात आला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Eknath Shinde

    पुढील बातम्या