मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, फरक पडत नाही!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, काही फरक पडत नाही! ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता (प्रतिनिधी),

पुणे, 3 जुलै- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील-नसतील, काही फरक पडत नाही! ते माणूस म्हणून कसे आहेत ते महत्वाचं आहे. देवेंद्र हे कायम माझ्यासोबत भक्कमपणे उभे असतात, असे मि.मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पत्नी असण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. टीकेचे जे दगड माझ्यावर मारले जातात. त्यातील constructive (रचनात्मक) दगड महत्त्वाचे जे desteuctive(नकारात्मक) त्याकडे लक्ष न दिलेले बरे असे अमृता फडणवीस यांनी परखडपणे सांगितले.

अमृता फडणवीस पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. निमित्त होतं उषा संजय काकडे यांच्या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमात गौरी शाहरूख खानही सहभागी झाल्या होत्या. गाणं, संगीत ही पॅशन असलेल्या अमृताला मुलाखतकार आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने 4 ओळी गुणगुणायला सांगितलं. तेव्हा अमृता यांनी 'हर पल यहा जी भर जियो कल हो ना हो,' हे गाणं गुणगुणलं.

कॅलिफोर्निया कॉन्सर्टमध्ये अशा ग्लॅमरस दिसल्या होत्या मिसेस मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी नुकत्याच लॉस अँजेलीस दौऱ्यावर होत्या. चॅरिटी ट्रस्टसाठी त्यांनी खास 'जय हो' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

अमृता फडणवीस यांनी आपल्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजीशियन ऑफ इंडियन ओरिजीन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हृदयविकार, ल्युकोमिया, लिम्फोमा अशा आजारांनी त्रस्त असलेल्या भारत आणि अमेरिकेतील रुग्णांसाठी हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता.

या कॉन्सर्टचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये गाणं गातानाचा अमृता यांचा आत्मविश्वास कोणत्याही नावाजलेल्या गायकापेक्षा कमी दिसत नाही. गाण्यासोबतच अमृता यांनी आपल्या पेहरावाकडेही लक्ष दिलं. कोणत्याही अभिनेत्रीला लाजवेल अशा आत्मविश्वासाने त्या वावरत होत्या. अमृता यांना बॉलिवूडचे दिग्गज गायक सुखविंदर सिंग यांनी साथ दिली होती.

मेस्सी आणि रोनाल्डोलाही 'टफ फाईट' फुटबॉल खेळणाऱ्या गायीचा VIDEO व्हायरल

First published: July 3, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading