नरेंद्र मोदींच्या फेव्हरेट तीर्थस्थानी निकालाआधी फडणवीसांची महापूजा

नरेंद्र मोदींच्या फेव्हरेट तीर्थस्थानी निकालाआधी फडणवीसांची महापूजा

गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी अनेकदा केदारनाथला गेले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी केदारनाथला जाऊन दर्शन घेतलं होतं.

  • Share this:

केदारनाथ 23 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता फक्त काही तास राहिलेत. अवघ्या काही तासांमध्ये राज्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. प्रचाराचा शीण आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपच्या गादारोळात दोन दिवसाचा वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तराखंडमध्ये जाऊन केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि महापूजा केली. चार धामांपैकी केदारनाथ हे महत्त्वाचं तीर्थस्थान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या धार्मिक स्थानांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी अनेकदा केदारनाथला गेले होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींनी केदारनाथला जाऊन दर्शन घेतलं होतं.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी सकाळी केदारनाथाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. केदारनाथच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकाराने तीथे एक खास विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या प्रकल्पाचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

BCCI अध्यक्ष होताच धोनीच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाला गांगुली?

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.

काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे समोर, 'इतक्या' जागा जिंकण्याचा केला दावा

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला मोठं बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या