शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शाह नाराज, मुख्यमंत्रिपदावर तडजोड नाही

शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शाह नाराज, मुख्यमंत्रिपदावर तडजोड नाही

'सत्तेमध्ये समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप नव्हे. शिवसेनेनेच चर्चेची दारं बंद केलीत.'

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 4 नोव्हेंबर : राज्यातल्या सत्तास्थापनेसाठी निर्माण झालेली कोंडी फुटण्याची अजुनही शक्यता दिसत नाहीये. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी होती असं सांगितलं जातं. मात्र या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यावर अमित शहा नाराज असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्रिपदावर कुठल्याही स्थितीत तडजोड करण्यास भाजपची तयारी नाही. सध्या भाजपची वेट अँड वॉचची स्थिती राहणार असल्याचंही भाजपकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यातली सत्तास्थापनेची कोंडी सध्याच फुटण्याची शक्यत नाहीये.

'सेनेचे 20-25 आमदार भाजपच्या संपर्कात', आमदाराचा खळबळजनक दावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप गृहमंत्री पद देण्यासाठी तयार नाही. त्याचबरोबर नगरविकास मंत्रालय देखील देण्यास तयार नाही. त्यामुळे भाजपची वेट अँड वाचची भूमिका. शिवसेनेनेच चर्चेची दारे बंद केली आहेत. जेव्हा शिवसेना प्रतिसाद देईल तेव्हा आम्ही बोलू .शिवसेनेने हमी द्यावी त्यानंतर बोलू. सत्तेमध्ये समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्री पदाचे वाटप नव्हे. चर्चा सुरू झाली तर मागण्याचा विचार करू असं आता भाजपच्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.

VIDEO : मंत्रालयाबाहेर आंदोलन केल्यानं राजू शेट्टींसह 25 आंदोलक ताब्यात

अमित शहा आणि उध्दव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री नव्हते  त्यामुळे शिवसेना दावा करते त्याबद्दल  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना माहित नाही. शिवसेनेचा राष्ट्रवादीवर जास्त विश्वास ठेवत असल्याबद्दलही भाजप नाराज आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये सत्ता स्थापन होईल असं वाटत नाही. त्यामुळे 9 नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापनेची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राष्ट्रपती राजवट लागणार नाही असा भाजपला विश्वास आहे. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चांमध्ये मंत्रिमंडळात  निम्मा निम्मा वाटा ठरला होता. त्याचा अर्थ मुख्यमंत्रिपद होत नाही असंही भाजपकडून सांगण्यात येतेय. निवडणुकीत पराभूत झालेल्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होवू शकतो मात्र निर्णय दिल्लीत होणार आहे. शिवसेनेमुळे भाजपच्या 12 ते 15 जागा पराभूत झाल्यात असं भाजपला वाटतं. निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत केली असंही भाजपला वाटत असून त्याचा फटका बसल्याचं सांगितलं जातंय.

सरकार कधी स्थापन होणार? भाजप नेता म्हणाले, 'अज्ञानात सुख असते'

शेतकऱ्यांना मदत मिळणार - मुख्यमंत्री

अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत. ते म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांची आज सकाळी नवी दिल्ली येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जवळजवळ 325 तालुक्यात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आज केंद्र सरकारला सादर करण्यात आला. केंद्र सरकारने तत्काळ मदत करावी, अशी विनंती यावेळी केली. केंद्र सरकारने सुद्धा निरीक्षणासाठी तत्काळ चमू पाठविण्याचे आश्वासन दिले आहे. विमा कंपन्यांसोबत बैठक करून केंद्र सरकारने त्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत. नियम शिथिल करून शेतकर्‍यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी यावेळी केली. त्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले आहे आणि तशा तत्काळ सूचना अधिकार्‍यांना त्यांनी दिल्या अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

First published: November 4, 2019, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading