जिसने छोडा मोदीका साथ, उसका हुआ सत्यानाश - फडणवीस

जिसने छोडा मोदीका साथ, उसका हुआ सत्यानाश - फडणवीस

आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण काढून आम्ही ते मराठा समाजाला देऊ पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आणि ओबीसी मंत्रालयही तयार केलं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, कोटोल 2 ऑगस्ट : महाजनादेश यात्रेवर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा सध्या त्यांच्याच गृहजिल्ह्यात म्हणजे नागपुरात आहे. काटोल इथं जाहीर सभा घेऊन त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली. आधी भाजपचे आमदार असलेले देशमुख यांनी ऑक्टोबर 2018मध्ये भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणाले, मी तुमची माफी मागतो कारण गेल्यावेळी देखील मी तुमच्याकडे आलो होतो पण ज्याच्याकरता आलो होतो तो पळपुटा निघाला. पण जो मोदीजी का साथ छोडता है उसका सत्यनाश होता है अशीही टीका त्यांनी केली.

सिझेरियन करताना महिलेच्या पोटात राहिला कापसाचा गोळा, तीनच दिवसात मृत्यू

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गेल्या 5 वर्षात अनेक जण सांगत होते की आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण काढून आम्ही ते मराठा समाजाला देऊ पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं आणि ओबीसी मंत्रालयही तयार केलं.

पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, सोडणार नाही!

सरकार चालवायचं ते सामान्यांकरता, गरीबांकरता, आम्ही स्वत:साठी काही केलं नाही, जे काही केलं ते जनतेसाठी केलं, पारदर्शी आणि प्रामाणिकपणे केलं. काटोलमध्ये काही बँकांनी बदमाशी केली, आम्ही तुमच्यासाठी पैसे दिले ते त्यांनी तुम्हाला दिले नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि तुमचे पैसे तुम्हाला दिले जातील. ज्यानं आपल्याला निवडून दिलं त्यांच्यासमोर लेखाजोखा मांडण्याची पद्धत आहे, त्यासाठी मी तुमच्या समोर येऊन जनादेश घेण्यासाठी आलोय.

ट्रिपल तलाक..महाराष्ट्रात पहिला गुन्हा, 7 महिन्यांची गरोदर होती तक्रारदार महिला

जे काम गेल्या पन्नास वर्षांमध्ये झालं नाही ते काम आम्ही केलं असा दावाही त्यांनी केला. शेती, पाणी, वीज, उद्योग, पायाभूत सुविधा अशा सगळ्या क्षेत्रात सरकारने भरघोस काम केलं असंही ते म्हणाले. खूप कामं झाली असली तरी अजून खूप कामं करायची आहेत असंही त्यांनी सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांची शहानिशा विरोधी पक्षांनी सुरू केलीय. 1 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अमरावतीजवळच्या गुरुकुंज मोझरी इथून सुरू झाली. राज्यभर ही यात्रा फिरणार असून निवडणुक जाहीर होण्याआधीची प्रचाराची एक फेरी ते पूर्ण करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 09:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading