रत्नागिरी, 2 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण (Tiware Dam) दुर्घटनाग्रस्तांसाठी सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे चिपळुण (Chiplun) तालुक्यातील अलोरे (Alore) येथे बांधण्यात आली आहेत. सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण झाल्याने नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण होते मात्र नागरिकांच्या चेहऱ्यावर हा आनंद फार काळ टिकला नाही कारण, या घरांपैकी दोन घरांना गळती (House leakage) लागल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या 10 घरांपैकी 2 घरात स्लॅब मधून पाणी शिरत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आहे. घराची अवस्था पाहून लाभार्थ्यांचा घर ताब्यात घेण्यास नकार दिला. 70 वर्षांच्या राधिका चव्हाण यांना संताप अनावर झाला आणि अशी चेष्टा करण्यापेक्षा मारून टाका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 4 नंबर आणि 9 नंबर घरात अनेक ठिकाणी घराला गळती लागली आहे.
महाविकास आघाडीचा करेक्ट करण्याची हीच ती वेळ? रावसाहेब दानवेंनी म्हटलं...
सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत. वित्त हानी भरून काढता येते परंतू मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Ratnagiri