'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार', भाजपच्या कार्यालयामोर सेनेचे होर्डिंग्स

मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर बोलू नका असं सांगूनही शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते यावर वक्तव्य करून वाद निर्माण करताहेत.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 16 जुलै : मुख्यमंत्री पदाबाबत कुणीही वक्तव्य देऊ नका अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष कर मुख्यमंत्री पदावारून वातावरण तापविण्याचं काम काही नेतेमंडळी करत आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेने भाजपच्या कार्यालया बाहेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे होर्डिंग्स लावून नवा वाद निर्माण केला. पोलिसांनी हे अवैध होर्डिंग्स काढून टाकले आहेत.

महाराष्ट्र भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी काल मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे वक्तव्य नाशिकमध्ये केले होते आणि याचे पडसाद आता शहरात उमटायला सुरुवात झाली असून सिडको परिसरातील शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी भाजप कार्यालयासमोर तसेच शहरातील अनेक ठिकाणी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. विशेष म्हणजे ही माझी भूमिका नसून पक्षाचीच भूमिका असल्याचं नगरसेविका गामणे यांनी म्हंटलय.

'अमित शहा, मुख्यमंत्री आणि आमचं ठरलं आहे, यात कोणी नाक खुपसू नये'

'मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं ठरलंय'

या विषयावर कार्यकर्ते आणि नेत्यांनी बोलू नये, मुख्यमंत्री कोण असेल हे अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकेर हे मिळून निर्णय घेतील. आमचं ठरलं आहे असं भाजप आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं मात्र याविषयावरचा वाद वारंवार निर्माण केला जातोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताना जी कविता म्हटली होती त्यात राज्याच्या सेवेकरता मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. तर पंढरपूरमध्ये महापुजेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतानाही मी पुढच्या वर्षी पुन्हा पुजेसाठी येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिल्याचं बोललं जातंय.

भाजप नेत्यांची धाकधूक वाढली, 30 आमदारांना घरी बसावं लागणार?

'अनेक प्रश्न महत्त्वाचे'

एकीकडे मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार असं भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे तर युतीबाबत आमचं ठरलं, त्यामुळे त्यात कोणी नाक घालू नका अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. 'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचं युती बाबत ठरलं आहे. त्यामुळे इतर कोणी त्यात तोंड घालू नये' अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

पत्रकारांनी गिरीश महाजन यांच्या 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार' या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता ते बोलत होते. 'शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

First Published: Jul 16, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading