मिशन विधानसभा निवडणूक, महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

मिशन विधानसभा निवडणूक, महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

मतदार राजाला आता थेट साद घालण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जुलै : लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही बाजी मारण्यासाठी भाजप कामाला लागली आहे. यानिमित्तानं मतदार राजाला आता थेट साद घालण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहे. भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहेत. संपूर्ण राज्य ते पिंजून काढणार आहेत.

ही यात्रा 1 ते 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात्रेदरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील स्थानिकांशी संपर्क साधणार आहेत. तसेच भाजप सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनाही ते भेटणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील असणार आहेत.

(पाहा :विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा, इतर टॉप 18 बातम्या)

(पाहा :...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत)

तर दुसरीकडे, 'जन आशीर्वाद यात्रे'च्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'जन आशीर्वाद यात्रे'ला जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथून धडाक्यात सुरुवात झाली. आदित्य यांची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज नेते कसून तयारी करत आहेत. चार हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा सर्व महाराष्ट्रात जाणार आहे. या यात्रेत ते विविध गटांशी संवाद ही साधणार असून त्याला 'आदित्य संवाद' असं नाव देण्यात आलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

'मी शिवसेनेसोबतच भाजपच्याही मतदारसंघात त्यांचा प्रचार करेन. कारण आमची युती अभेद्य आहे. इथं मी लोकांची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. राजकीय नेते निवडणुकीनंतर लोकांना विसरतात मात्र आम्ही लोकांना विसरलो नाही,' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

'...तर आदित्य ठरतील पहिलेच निवडणूक लढवणारे पहिलेच ठाकरे'

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे अनेक वर्ष महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले. मात्र ते कधीही प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले नाहीत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हेही निवडणूक लढवण्यापासून दूरच राहिले. पण आता आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीला उभे राहिल्यास प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ते पहिलेच ठाकरे होतील.

(पाहा : सायकल, डबल सीट आणि अमोल कोल्हेंच्या तरुणांना कानपिचक्या, VIDEO व्हायरल)

VIDEO: काँग्रेसची अवस्था सांगताना रावसाहेब दानवेंनी सांगितला विनोदी किस्सा

Published by: Akshay Shitole
First published: July 21, 2019, 1:23 PM IST

ताज्या बातम्या